भारत आणि इंग्लंड यांमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका 4 ऑगस्टपासून नॉटिंघमच्या ट्रेन ब्रिज मैदानावर खेळली जाणार आहे. या मालिकेपुर्वी भारतीय संघाचा दिग्गज कसोटी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण याने उपकर्णधार अजिंक्य रहाणेचे तोंडभरून कौतुक केले आहे. रहाणेवर त्याच्या खराब फॉर्ममुळे मागच्या काही दिवसांपासून बोट दाखवले जात आहे. पण लक्ष्मणचे म्हणणे आहे की भारतीय कसोटी संघाच्या फलंदाजीसाठी रहाणे महत्त्वाचा खेळाडू आहे.
स्टार स्पोर्टचा कार्यक्रम गेम प्लॅनमध्ये लक्ष्मण म्हणाला, ‘मला वाटते की रहाणे भारतीय संघाच्या फलंदाजीसाठी खूप महत्त्वाचा खेळाडू आहे. मला आजही लक्षात आहे, त्याने परदेशी परिस्थितीत लॉर्डस किंवा मेलबर्नमध्ये कशाप्रकारे उत्कृष्ट फलंदाजी केली होती. तो भारतीय संघासाठी एका हत्याराप्रमाणे (इंस्ट्रूमेंट) आहे. जेव्हा तो मध्यक्रमात खेळायला उतरतो तेव्हा धावा बनवतो. तो विरोधी संघाच्या गोलंदाजांवर हावी होतो. पण एक गोष्ट आहे जिथे त्याला त्याच्या खेळीत काम करायला पाहिजे.’
‘शॉर्ट चेंडू कशाप्रकारे खेळायचा, यावर रहाणेला काम करण्याची आवश्यकता आहे. तुम्ही न्यूझीलंडमध्ये आणि जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यामध्ये पाहिले आहे. विरोधी संघाने त्याच्याविरोधात शॉर्ट चेंडू टाकला आणि त्याच्याकडे एकच पर्याय होता चेंडूला पुल करण्याचा. जेव्हा तुम्ही या स्तरावर क्रिकेट खेळत असता, तेव्हा तुम्हाला माहीत पाहिजे की कोणत्या चेंडूवर शॉट खेळायचा आणि कोणता सोडून द्यायचा. मला वाटते की रहाणेला या गोष्टीवर काम करण्याची गरज आहे,’ असे लक्ष्मण म्हणाला.
इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेचे पूर्ण वेळापत्रक
पहिला सामना, 4 ते 8 ऑगस्ट, नॉटिंघम, दुपारी 3.30
दुसरा सामना, 12 ते 16 ऑगस्ट, लंडन, दुपारी 3.30
तिसरा सामना, 25 ते 29 ऑगस्ट, लीड्स, दुपारी 3.30
चौथा सामना, 2 ते 6 सप्टेंबर, लंडन, दुपारी 3.30
पाचवा सामना, 10 ते 14 सप्टेंबर, मँचेस्टर, दुपारी 3.30
भारतीय कसोटी संघ: विराट कोहली (कर्णधार) मयंक आगरवाल, रविचंद्र अश्विन ,जसप्रीत बुमराहा, अभिमन्यू ईश्वरन, रवींद्र जडेजा, रिषभ पंत, अक्षर पटेल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, के एल राहुल, विद्यमान सहा, मोहम्मद शमी, ईशान शर्मा, रोहित शर्मा, पृथ्वी शॉ, शार्दूल ठाकुर, हनुमा विहरी, उमेश यादव, सूर्यकुमार यादव.
इंग्लंड कसोटी संघ: जो रूट (कर्णधार), जेम्स अँडरसन, जॉनी बेयरेस्टो, डॉम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जोस बटलर, मॅप क्रोले, सेम करण, हसिब हमीद, डॉम सिब्ले, मार्क वुड.
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत विराट कोहली बनू शकतो ‘विक्रमांचा बादशाह’, वाचा सविस्तर
भारत विरुद्ध इंग्लंड कोण जिंकणार मालिका?, दोन इंग्लिश कर्णधारांनी दिले ‘हे’ उत्तर
कौतुकास्पद! “कसोटी क्रिकेट टिकवण्यासाठी सर्वस्व झोकून देईल”, विराटने दिला शब्दर






