---Advertisement---

कौतुकास्पद! “कसोटी क्रिकेट टिकवण्यासाठी सर्वस्व झोकून देईल”, विराटने दिला शब्द

On: बुधवार, ऑगस्ट 4, 2021 3:06 AM
Virat Kohli
---Advertisement---

इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होण्यास अगदी काही तासांचा अवधी शिल्लक आहे. दोन्ही संघ या इतिहासिक मालिकेसाठी पूर्णता सज्ज झाले आहेत. या मालिकेपूर्वी भारतीय कर्णधार विराट कोहलीने मालिकेचे प्रसारण करणाऱ्या वाहिनीचा प्रतिनिधी म्हणून काम करत असलेला भारताचा वरिष्ठ क्रिकेटपटू दिनेश कार्तिक याला मुलाखत दिली. या मुलाखतीत दोघांमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. त्यापैकी कसोटी क्रिकेटच्या भविष्याविषयी बोलताना विराटने अनेक महत्त्वपूर्ण विधाने केली.

हा एकटा विराट कसोटी क्रिकेटसाठी सर्वकाही करेल
दिनेश कार्तिकला दिलेल्या मुलाखतीत कसोटी क्रिकेटची सद्यस्थिती व भविष्य या प्रश्नावर बोलताना विराटने सर्वांची मने जिंकणारे विधान केले. कार्तिकने त्याला विचारले कसोटी क्रिकेट असेच चालत राहण्यासाठी आणखी काही विराट कोहलींची आवश्यकता आहे का?

त्यावर विराट उत्तरला, “हे अवघड वाटते. मात्र, सध्या तुमच्याकडे एक विराट आहे आणि तो जोपर्यंत खेळत आहे, तोपर्यंत कसोटी क्रिकेटसाठी सर्वस्व झोकून देईल. मला इतरांचे माहीत नाही. परंतु, कसोटी क्रिकेट हेच माझ्यासाठी सर्वोच्च शिखर आहे.”

या मुलाखतीत विराटने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेबद्दल प्रतिक्रिया दिली. तसेच, तू या मुलाखतीत वडिलांच्या आठवणीने भावूक झाला.

इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी करण्याचे आव्हान
विराटने यापूर्वी दोन वेळा इंग्लंड दौरा केला असून, २०१४ दौऱ्यात तो पूर्णतः अपयशी ठरला होता. मात्र, २०१८ दौऱ्यावेळी त्याने मागील अपयश धुवून काढतात जबरदस्त कामगिरी केली होती. बुधवारी सुरू होणाऱ्या मालिकेत तो पुन्हा एकदा २०१८ दौऱ्यातील कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करेल. तसेच, २००७ नंतर प्रथमच इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याचे आव्हान विराट व भारतीय संघासमोर असेल.

महत्त्वाच्या बातम्या – 

बांगलादेश क्रिकेट संघाची ऐतिहासिक कामगिरी, ऑस्ट्रेलियावर मिळवला दणदणीत विजय

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीपूर्वी ‘कर्णधार’ कोहलीने केली पुजाराची पाठराखण; म्हणाला, ‘त्याला एकटे सोडून द्या’

‘त्या’ खेळाडूला इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियात मिळायला हवी होती संधी, युवराज सिंगने उपस्थित केले प्रश्न

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---