---Advertisement---

ENGvIND: अष्टपैलू २ तर वेगवान गोलंदाज ४, टीम इंडियाविरुद्ध ‘असा’ असेल जो रूटचा संघ

On: बुधवार, ऑगस्ट 4, 2021 9:47 AM
---Advertisement---

आजपासून (४ ऑगस्ट) भारत विरुद्ध इंग्लंड संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना आज ट्रेंट ब्रिजच्या मैदानावर सुरू होणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे. कारण ही विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामातील पहिलीच मालिका आहे. त्यामुळे दोन्ही संघ या सामन्यात आपला पूर्ण जोर लावतील. दोन्हीही संघात एकापेक्षा एक उत्कृष्ट खेळाडू आहेत, जे कोणत्याही क्षणी सामन्याचे चित्र बदलू शकतात. चला तर पाहूया हे दोन्ही संघ कशा प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरू शकतात.

इंग्लंड आपल्या संघात सॅम करण आणि ऑली रॉबिनसन या दोन्ही खेळाडूंना संधी देण्याचा विचार करत आहे. हे दोघेही गोलंदाज आवश्यकता भासल्यास चांगली फलंदाजी देखील करू शकतात. तसेच ट्रेंट ब्रिजच्या मैदानावर खूप गवत आहे. त्यामुळे इंग्लंड संघ ४ वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरू शकतो. (Probabal playing 11 of England and Indian team for 1st test)

इंग्लंड संघाची संभावित प्लेइंग इलेव्हन 
रॉरी बर्न्स, डोम सिब्ली, जॅक क्राउले, जो रूट (कर्णधार), ऑली पोप, जोस बटलर (यष्टीरक्षक), सॅम करण, ऑली रॉबिनसन, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक लीच आणि जेम्स अँडरसन.

तर भारतीय संघाने देखील अजुनपर्यंत आपल्या प्लेइंग इलेव्हनचा खुलासा केलेला नाही. विराटने असे म्हटले आहे की, नाणेफेक झाल्यानंतर अंतिम प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली जाईल. यापूर्वी क्रिकेट चाहत्यांना अनेक प्रश्न पडले आहेत. पहिल्या कसोटी सामन्यात रोहितसोबत डावाची सुरुवात कोण करणार? भारतीय संघात कुठल्या गोलंदाजांना संधी दिली जाईल?

माध्यमातील वृत्तानुंसार भारतीय संघ केएल राहुलला सलामी फलंदाजी करण्यासाठी पाठवू शकतात. तर शार्दुल ठाकूरला अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात स्थान दिले जाऊ शकते. मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार विराट कोहलीने शार्दुल ठाकूरचे कौतुकही केले होते.

भारतीय संघाची संभावित प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर,आर अश्विन, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह

महत्त्वाच्या बातम्या-

“चेतेश्वर पुजारा एक निमित्त आहे, खरे लक्ष्य तर अजिंक्य रहाणेला संघाबाहेर काढण्याचे आहे”

‘पुजारावर विश्वास नसेल, तर सरळ त्याला बाहेर करा आणि दुसऱ्याला संधी द्या’

जोडीदारानेच ज्याच्यावर भर मैदानात उगारला होता हात, त्यानेच टी२०त ४ विकेट्स घेत कांगारूंना चारली धूळ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---