भारताचा लेग स्पिनर अमित मिश्राने भारतीय फलंदाज विराट कोहलीबाबत वादग्रस्त विधान केले होते. मिश्रा म्हणाला होता की, पैसा आणि प्रसिद्धी मिळाल्यानंतर कोहली बदलला आहे, जो कोहली मी आधी भेटलो होतो. तो आता नाही. याशिवाय लेग स्पिनर मिश्राने असेही म्हटले होते की, धोनी, कपिल देव आणि सचिन यांना भारतीय क्रिकेटमध्ये जो मान मिळतो. तो मान कोहलीला मिळू शकणार नाही. कारण मैदानावरील त्याचे वर्तन अत्यंत दुर्दैवी आहे. मिश्रा यांच्या या वक्तव्याने सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडाली होती. मिश्राच्या या वक्तव्यावर चाहते सर्व प्रकारच्या गोष्टी बोलत आहेत. यावर आता मोहम्मद शमीने देखील आपले मत मांडले आहे.
शमीने शुभंकर मिश्राच्या यूट्यूब शोवर आपले मत व्यक्त केले आणि सांगितले की, “अनेक माजी क्रिकेटपटूंना माहित आहे की ते कोहलीविरुद्ध काही बोलले की त्यांचे नाव दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर असेल, म्हणून त्यांनी मुद्दाम या गोष्टी करतात”. शमीचे हे उत्तर चाहत्यांनाही खूप आवडले.
याशिवाय शमीने कोहलीबद्दलही सांगितले आणि म्हणाला, “विराट कोहलीसोबत माझे बाँडिंग खूप चांगले आहे. आम्ही एकमेकांना नेटवर आव्हान देतो – हे मजेदार आहे आणि यावरून आमची मैत्री आणि बॉन्डिंग दिसून येते.” याशिवाय शमीने असेही सांगितले की कोहलीला नेटमध्ये त्याच्याविरुद्ध खेळायला आवडते पण रोहितला त्याची गोलंदाजी खेळायला आवडत नाही.
इंझमाम-उल-हकने भारतीय गोलंदावार केलेल्या आरोपावर शमीने आपले मत मांडले आणि त्याला फटकारले की, “इंझमाम हा महान खेळाडू आहे यात काही शंका नाही, पण त्याचे विधान अतिशय खराब आहे. पाकिस्तान आमच्या कामगिरीवर कधीच आनंदी नव्हतं आणि नसेल. कुणीतरी म्हणतं आम्हाला वेगळा चेंडू दिला होता, कुणीतरी म्हणतं चेंडूमध्ये चीप होती. त्यांच्या गोलंदाजांनी स्विंग केला तर स्किल आणि आम्ही स्विंग केला तर बॉल टेंपरिंग किंवा चेंडूमध्ये चीप असते.
महत्त्वाच्या बातम्या-
‘धोनी आणि रिझवान तुलना करणे म्हणजे…’, माजी क्रिकेटरनी पाकिस्तानी पत्रकराला शिकवला चांगलाच धडा
‘बुमराह नाही तर..’, हा गोलंदाज सर्वात धोकादायक, मोहम्मद शमीच्या या वक्तव्याने उडाली खळबळॉ
श्रीलंका मालिकेपूर्वी कोहली आणि गंभीरमधील जुने मतभेद संपले? विराटनं बीसीसीआयला स्पष्टचं सांगितले