भारताचा माजी दिग्गज कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) सध्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) या संघाकडून खेळतो आहे. पण आयपीएल 2025 हा त्याचा शेवटचा हंगाम असेल का? असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या पडत आहेत. त्यावर आता भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनं (Mohammed Shami) वक्तव्य केलं आहे.
आयपीएल 2023 मध्ये सीएसकेला 5व्यांदा आयपीएलचे जेतेपद मिळवून दिल्यानंतर धोनीनं चाहत्यांना आणखी एका हंगामात परतण्याचं वचन दिलं होतं आणि तो 2024 मध्ये देखील खेळला. मात्र, या हंगामात चेन्नईचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्यात अपयशी ठरला. यानंतर धोनी निवृत्तीची घोषणा करेल असं सर्वांना वाटत होतं. परंतू त्यानं याबाबत अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही.
शमी एका पाॅडकास्टशी बोलताना म्हणाला, “तुम्ही लोक धोनीच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात. तो स्वतः म्हणतो, ते बघितले जाईल.” पुढे बोलताना शमी म्हणाला की, “मी एकदा धोनीला विचारलं होतं की, एखाद्या खेळाडूनं कधी निवृत्ती घ्यावी? त्यावर तो म्हणाला होता की, पहिले, जेव्हा तुम्ही स्वतः कंटाळता आणि दुसरे, जेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला लाथ मारली जाईल.”
पुढे बोलताना शमी म्हणाला की, “प्रथम आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, जेव्हा तुम्ही खेळाचा आनंद घेणं थांबवता, तेव्हा हे समजतं की आपली निवृत्ती घेण्याची वेळ आली आहे. निवृत्तीसाठी सर्वोत्तम फारमॅट निवडला पाहिजे. कारण तुम्ही एखाद्या विशिष्ट फॉरमॅटमध्ये जास्त दिवस खेळू शकत नाही. कारण तुमचं शरीर तुम्हाला सिग्नल द्यायला लागतं. तुमचं शरीर तुम्हाला सांगतं हीच वेळ आहे जेव्हा खेळाडूनं निवृत्ती घ्यावी.”
आयपीएल 2024च्या हंगामात चेन्नईचा संघ प्लेऑफसाठी क्वालिफाय करु शकला नाही. विराट कोहलीच्या (Virat Kohli) आरसीबीनं चेन्नईला पराभूत करुन प्लेऑफच्या बाहेर काढलं होतं. त्यानंतर चर्चांना उधाण आलं होतं की, धोनी आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा करेल. परंतू त्यानं अद्याप आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
फक्त 2 फलंदाज हे करू शकले, आता बारी विराटची! 152 धावा करताच बनेल मोठा रेकॉर्ड
भारताची सेमीफायनलमध्ये थाटात एँट्री…! यूएईवर 78 धावांनी मिळवला शानदार विजय
मोर्ने मोर्केल नाही! श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाला मिळाले नवे गोलंदाजी प्रशिक्षक