सध्या सुरू असलेल्या वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत भारताच्या वेगवान गोलंदाजांनी जबरदस्त स्विंग गोलंदाजीचे प्रदर्शन केले आहे. गोलंदाजांच्या या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे भारतीय संघाने सलग आठ सामने जिंकले आहेत. असे असतानाच पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू हसन रझा यांनी भारतीय गोलंदाजांबाबत एक वादग्रस्त विधान केले होते. त्यावर आता भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
संपूर्ण विश्वचषकात भारताच्या वेगवान गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करताना विरोधी संघांवर दबाव ठेवला आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी व सिराज यांनी विरोधी संघांना अक्षरशः जखडून ठेवून आपला दबदबा निर्माण केला. श्रीलंकेला केवळ 55 धावांवर सर्वबाद केल्यानंतर पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू हसन रझा म्हणाले,
“मला असे वाटत आहे की, आयसीसी आणि बीसीसीआय भारतीय गोलंदाजांना वेगळ्या पद्धतीचा चेंडू देत आहेत. हा चेंडू अधिक स्विंग होतोय. याची चौकशी व्हायला हवी.”
Shami hitting strongly on-field & off-field….!!!! pic.twitter.com/hpbvum2VMl
— Johns. (@CricCrazyJohns) November 8, 2023
त्यावर प्रतिक्रिया देताना शमी याने नुकतीच एक इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट केली. यामध्ये त्याने लिहिले,
“थोडी लाज वाटू द्या रे. खेळावर लक्ष केंद्रित करा बाकीच्या फालतू गोष्टींवर नाही. जरा दुसऱ्याच्या ही यशाचा आनंद घ्या. हा विश्वचषक आहे एखादी घरातील स्पर्धा नाही. तुम्ही तर एक खेळाडू देखील राहिला आहात. वसीम भाईने देखील तुम्हाला सांगितले आहे. दिग्गज वसीम भाईवर तरी विश्वास ठेवा. स्वतःचेच कौतुक करत आहात जस्ट लाईक वाव.”
रझा यांच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तानचे माजी कर्णधार वसीम अक्रम यांनी हे सर्व हास्यस्पद असल्याचे म्हटले होते.
(Mohammad Shami Slams Pakistan Former Cricketer Hasan Raza)
हेही वाचा-
लय भारी! मॅक्सवेलची विस्फोटक खेळी पाहून अभिनेता रितेश देशमुखही बनला फॅन, म्हणाला, ‘हारलेली लढाई…’
ODI Rankings: 24 वर्षीय शुबमन बनला जगातील नंबर 1 फलंदाज, बाबरची बादशाहत संपुष्टात