भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने वनडे विश्वचषक 2023मध्ये संघासाठी अप्रतिम गोलंदाजी केली. शमीच्या गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली होती. याच महत्वपूर्ण योगदानासाठी शमीला भातर सरकारकडून मोठे बक्षिस दिले जाणार आहे. बुधवारी (20 डिसेंबर) शमीचे नाव 2023 सालच्या आर्जुन पुरस्काराशाठी निश्चित केले गेले.
विश्वचषक स्पर्धेत अप्रतिम गोलंदाजी करणाऱ्या मोहम्मद शमी (Mohammad Shami) याच्यासोबत एकूण 26 खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने (Arjuna Award 2023) सन्मानित केले जाणार आहे. यात पॅरा ऍथलिट शीतल देवी हिचे नाव आहे. पुढच्या महिन्यात म्हणजे जानेवारी 2023 मध्ये क्रीडा क्षेत्रात देशासाठी चमकदार कामगिरी करणाऱ्या या खेळाडूंना सन्मानित केले जाणार आहे. क्रीडा मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार 9 जानेवारी रोजी राष्ट्रपती भवनात पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम पार पडले. राष्ट्रपतींच्या हस्ते सर्व खेळाडूंना हे पुरस्कार दिले जातील.
अर्जुन पुरस्कार मिळालेले सर्व 26 खेळाडू
1. ओजस प्रवीण देवताले (नेमबाजी)
2. अदिति गोपीचंद स्वामी (नेमबाजी)
3. श्रीशंकर एम (एथलेटिक्स)
4. पारुल चौधरी (एथलेटिक्स)
5. मोहम्मद हुसामुद्दीन (बॉक्सिंग)
6. आर वैशाली (बुद्धीबळ)
7. मोहम्मद शमी (क्रिकेट)
8. अनुश अग्रवाल (घोडेस्वारी)
9. दिव्यकृति सिंह (घोडेस्वारी ड्रेसेज)
10. दीक्षा डागर (गोल्फ)
11. कृष्ण बहादुर पाठक (हॉकी)
12. पुखरामबम सुशीला चानू (हॉकी)
13. पवन कुमार (कबड्डी)
14. रितु नेगी (कबड्डी)
15. नसरीन (खो-खो)
16. पिंकी (लॉन बॉल्स)
17. ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर (शूटिंग)
18. ईशा सिंह (शूटिंग)
19. हरिंदर पाल सिंह संधू (स्क्वैश)
20. अयहिका मुखर्जी (टेबल टेनिस)
21. सुनील कुमार (कुस्ती)
22. अंतिम (कुस्ती)
23. नाओरेम रोशिबिना देवी (वुशु)
24. शीतल देवी (पॅरा धनुर्विद्या)
25. इलूरी अजय कुमार रेड्डी (ब्लाइंड क्रिकेट)
26. प्राची यादव (पैरा कॅनोइंग)
(Mohammad Shami to receive the Arjuna Award)
बातमी अपडेट होत आहे…
महत्वाच्या बातम्या –
BBLमध्ये घोंगावलं जॉर्डन नावाचं वादळ! विस्फोटक बॅटिंग करत फक्त ‘एवढ्या’ चेंडूत झळकावली Fast Fifty, Record
टीम इंडियाच्या तारणहाराचा भाऊ IPL मध्ये Unsold, बेस प्राईजलाही कुणीच घेतलं नाही संघात