---Advertisement---

सूर्यकुमारवरून आपापसांत भिडले २ भारतीय दिग्गज; श्रीकांत कैफला म्हणाले, तू असं केलं असता का?

Suryakumar Yadav
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव हा सध्या तुफान चर्चेत आहे. त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या २ टी२० सामन्यात सलामीवीर म्हणून अपेक्षित प्रदर्शन केले नव्हते. मात्र त्यानंतर तिसऱ्या टी२० सामन्यात झंझावाती अर्धशतक करत त्याने स्वतला उत्तम सलामीवीर म्हणून सिद्ध केले आहे. आता सूर्यकुमारच्या फलंदाजी क्रमावरून भारताचे २ दिग्गज खेळाडू आपापसांत भिडले आहेत. 

सूर्यकुमारने (Suryakumar Yadav) त्याच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात फिनिशरच्या रूपात केली होती. त्यानंतर पुढे जाऊन तो मधल्या फळीत फलंदाजी करू लागला. त्याच्या प्रदर्शनाने प्रभावित होत कर्णधार रोहित शर्माने आता वेस्ट इंडिजविरुद्ध त्याला वरच्या फळीत संधी दिली आहे. काही माजी क्रिकेटपटू भारतीय संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयाशी सहमत आहेत. तर काहींना त्यांचा हा निर्णय पटलेला नाही. सूर्यकुमारच्या फलंदाजी क्रमाबद्दल (Suryakumar Yadav Batting Order) चर्चा करताना माजी क्रिकेटपटू कृष्णामाचारी श्रीकांत (K Srikkanth) आणि मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) एकमेकांमध्ये भिडले आहेत.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यातील सूर्यकुमारच्या मॅच विनिंग खेळीनंतर कैफ म्हणाला की, “कदाचित भारतीय संघ व्यवस्थापनाने सूर्यकुमारला वरच्या फळीत हे तपासण्यासाठी पाठवले असेल की, तो वेगाने धावा बनवू शकतो का नाही?.”

कैफचे हे विधान ऐकल्यानंतर श्रीकांत यांनी त्याला मध्येच थांबवत म्हटले की, “कैफ दोन्ही गोष्टींचे समर्थन करत आहे. तो सूर्यकुमारकडून सलामीला फलंदाजी करून घेण्यावरूनही खुष आहे आणि त्याला चौथ्या क्रमांकावर खेळवण्यावरही खुष आहे. सूर्यकुमारने डावाची सुरुवात का करावी? कैफ जर मी तुला म्हटले की, तू सलामी देशील का? तर तुला हे चांगले वाटेल का?”

श्रीकांत यांच्या या प्रश्नाचे उत्तर देताना कैफ म्हणाला की, “नाही”. यावर श्रीकांत पुढे म्हणाले की, “सूर्यकुमारलाही हीच गोष्ट लागू होते. तू त्याच्याबद्दल विचार कर.” अशाप्रकारे कैफ आणि श्रीकांत यांच्यात सूर्यकुमारच्या फलंदाजी क्रमावरून छोटीशी भिडंत झाली.

दरम्यान सूर्यकुमारला वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या दोन्ही टी२० सामन्यात सलामीला संधी मिळूनही विशेष कामगिरी करता आली नव्हती. पहिल्या सामन्यात २४ तर दुसऱ्या सामन्यात ११ धावा करत तो स्वस्तात पव्हेलियनला परतला होता. मात्र आता तिसऱ्या सामन्यातून त्याने जबरदस्त पुनरागमन केले आहे. वेस्ट इंडिजच्या १६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना त्याने सलामीला फलंदाजीला येत ४४ चेंडूत ७६ धावांची प्रशंसनीय खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ४ षटकार आणि ७ चौकारही मारले. त्याच्या या खेळीचे कौतुक त्याला सामनावीर पुरस्कार देत करण्यात आले.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

कार्तिकमुळेच रोहित बनला ओपनर! वाचा नऊ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेची इनसाईड स्टोरी

कर्णधार रोहितने घेतली ‘प्रतिज्ञा’, जग जिंकण्याआधी आशिया चषकावर कोरायचे आहे भारताचे नाव

वहिनी नसताना तुझी बॅट चांगलीच चालते..! जेव्हा लाईव्ह मुलाखतीत इशानने सूर्यकुमारची घेतली फिरकी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---