भारताचे मधल्या फळीतील माजी फलंदाज मोहम्मद कैफने भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वावर टीका केली आहे. कैफ म्हणाला की, विराट संघ निवडताना खूप प्रयोग करत असतो. त्याने असे करायला नाही पाहिजे.
सोशल मीडियाच्या हॅलो ऍपवर बोलताना कैफ यांनी विराटच्या रणनितीविषयी उलगडा करताना असे म्हटले आहे. Mohammed Kaif critisized virat kohli captaincy.
कैफ म्हणाला की, “विराटने संघ निवडताना वेगवेगळे प्रयोग न करता संघ निवडीवर व्यवस्थित लक्ष द्यायला पाहिजे. जर एखाद्या खेळाडूचा काही वेळासाठी फॉर्म बिघडला तर विराटने त्याला आधार द्यायला पाहिजे. त्याने खेळाडूंना व्यवस्थित तयार करायला पाहिजे. तेव्हाच त्याचा संघ मजबूत होईल.”
भारतीय संघातील यष्टीरक्षकाविषयी बोलताना कैफ म्हणाला की, “भारतीय संघाला एका तज्ज्ञ यष्टीरक्षकाची गरज आहे. केएल राहुल हा पर्यायी यष्टीरक्षक बनू शकतो. पण त्याला संघातील मुख्य यष्टीरक्षक बनवू नये. जर एमएस धोनीऐवजी ऋषभ पंतला निवडले जात असेल तर विराटने त्याला पाठिंबा द्यायला पाहिजे. पंतला संघातील वाॅटर बाॅय करायला नको. जर, विराट या दुविधेतून बाहेर पडला. तर विराट निवृत्तीपर्यंत सर्वात यशस्वी कर्णधार नक्की बनेल”.
शिवाय कैफ संघ निवडकर्त्यांवर खूप चिडला. तो म्हणाला की, “निवड समिती, संघ प्रशिक्षक किंवा कर्णधार यांनी त्या खेळाडूंना संधी द्यायला पाहिजेत, ज्यांना त्यांनी संघाबाहेर ठेवले आहे. प्रत्येक खेळाडू देशासाठीच खेळत असतो. त्याच्यावरही खराब वेळ येऊ शकते. म्हणून निवडकर्त्यांनी त्यांना संघाबाहेर न काढता त्याच्यातील उणीवा त्यांना सांगायला हव्यात. जेणेकरुन ते देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांच्यातील उणीवा सुधारुन चांगल्याप्रकारे तयार होतील.”
जर निवड समितीत पारदर्शकता असेल, तर कोणीही मीडियावर येऊन त्यांच्यावर आरोप करणार नाही. भारतीय क्रिकेटच्या सुरुवातीच्या काळाविषयी बोलताना कैफ म्हणाला की, “सुरुवातीच्या काळात भारतीय क्रिकेटची परिस्थिती जास्त चांगली नव्हती. तेव्हा खेळाडूंना मीडियाद्वारे त्यांना संघातून बाहेर काढले आहे हे कळत होते. पण आता तशी परिस्थिती नाही. परंतु, निवड समिती, संघ प्रशिक्षक आणि कर्णधार यांनी संघाबाहेरील खेळाडूंना बोलायला पाहिजे.”
ट्रेंडिंग घडामोडी-
सचिनला १९०वर बाद दिले असते तर मला दिले नसते जाऊ हाॅटेलवर
एका रनआऊटने झाले होते मैदानात दंगे, ६५ हजार प्रेक्षकांना स्टेडियमबाहेर…
जो खेळाडू संघात आपली जागा घेईल त्यालाच धोनी म्हणाला, ‘मित्रा तू आज…