भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी एमएस धोनीवर संघ निवडताना तो पक्षपात करतो, असे आरोप केले होते. मात्र, काल (१६ मे) भारतीय संघाचा माजी फलंदाज मोहम्मद कैफने योगराज यांच्या धोनीवरील आरोपांचे खंडन केले आहे.
सोशल मीडियाच्या लाइव्ह सेशनमध्ये कैफला योगराज यांच्या धोनीवरील आरोपांविषयी विचारण्यात आले होते.
यावर कैफ म्हणाला की, “मला नाही वाटत की युवीच्या वडिलांचे आरोप योग्य आहेत. युवराज मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा स्टार फलंदाज होता. त्याला अजून संधी मिळायल्या पाहिजे होत्या. पण, भारतीय संघात जेव्हा एखाद्या खेळाडूचा फॉर्म बिघडतो आणि त्याचे काही सामन्यातील प्रदर्शनही खराब असल्याचे दिसून येते. तेव्हा त्याला भारतीय संघातील आपले स्थान गमवावे लागते.”
३९ वर्षीय कैफ पुढे बोलताना म्हणाला की, “अनेक प्रतिभाशाली खेळाडू भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशात भारतीय संघातील कोणताही खेळाडू असो, त्याचा फॉर्म बिघडल्यास त्याला जास्त काळ संघात टिकून राहणे कठीण होते.”
“धोनीवरील हे आरोप निराधार आहेत. तो व्हाईट बॉल क्रिकेटमधील (कसोटी) यशस्वी कर्णधार आहे. त्यासाठी धोनीला त्याचा संघ निवडण्यासाठी थोडे स्वातंत्र्य असायला पाहिजे. तुम्ही त्याला फक्त तेव्हा विरोध करु शकता, जेव्हा तो चांगला खेळत नाही. पण, त्याचे विक्रम उल्लेखनीय आहेत.”
“धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला अनेक ट्रॉफी जिंकून दिल्या आहेत. त्यामुळेच संघ निवडकर्ता त्याला पूर्णपणे स्वातंत्र्य देतात आणि त्याच्या निर्यणांचा सन्मान करतात. तुम्ही याला पक्षपात म्हणूच शकत नाही,” असे कैफने पुढे म्हटले.
ट्रेंडिंग घडामोडी-
आफ्रिदी १६ वर्षांचा ‘जोकर’ स्वार्थापोटी करत आहे काश्मिरचं राजकारण
जर तुम्हाला त्याला पाठींबाच द्यायचा आहे तर मग वाॅटर बाॅयसारखे वागवू नका