---Advertisement---

आफ्रिदी १६ वर्षांचा ‘जोकर’ स्वार्थापोटी करत आहे काश्मिरचं राजकारण

On: रविवार, मे 17, 2020 1:33 PM
---Advertisement---

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेला माजी सलामीवीर फलंदाज व खासदार गौतम गंभीरने जोरदार प्रतित्तोर दिले आहे.

गंभीरने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की १६ वर्षांचा आफ्रिदी म्हणत आहे की पाकिस्तानच्या ७ लाख सैनिकांच्या मागे २० कोटी पाकिस्तानी नागरिक आहे. परंतु तरीही त्यांना ७० वर्षात काश्मिर घेता आलेले नाही.

गंभीरने आपल्या ट्विटमध्ये पुढे शाहिद आफ्रीदी, इम्रान खान व बाजवा सारखे लोक जोकर असून पाकिस्तानच्या लोकांना मुर्ख बनविण्यासाठी असलं विष कालविण्याच काम करत आहे, असंही म्हटलं आहे.

१९९८ ते २०१८ या २१ वर्षांमध्ये पाकिस्तानकडून क्रिकेट खेळणाऱ्या शाहिद आफ्रिदीवर सतत वयचोरीचा आरोप होतं आला आहे. गंभीरने हा धागाही ट्विटमध्ये पकडला आहे.

सध्या जग कोरोना या वैश्विक महामारीचा सामना करत आहे. तर शाहिद आफ्रीदी काश्मिर मुद्द्यावर भाष्य करत असलेला व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. यात तो काश्मिर मुद्द्यावर पंतप्रधान मोदींवर टीका करताना दिसला होता. यात त्याने ‘मोदी काश्मिरी लोकांवर अत्याचार करत असून याचं उत्तर द्यावं लागेल असे म्हटले आहे.’

https://twitter.com/ashokepandit/status/1261718511518224384

काही दिवसांपुर्वीच शाहिद आफ्रिदी पाकिस्तानमधील मंदीरात कोरोमामुळे बाधीत झालेल्या लोकांना मदत करत असतानाचे फोटो व्हायरलं झाले होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---