नुकताच इंग्लंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आला होता. या मालिकेत इंग्लंडने 3 सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडला व्हाईटवॉश दिला. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डात मोठे बदल बघायला मिळाले. पीसीबीच्या अध्यक्षपदावरुन रमीझ राजा यांना बरखास्त करण्याला आले. त्यांची जागी नजम सेठी यांना पीसीबीचा अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलेे, तसेच पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदी याची मुख्य निवडकर्ता म्हणून निवड करण्यात आली. शाहीद आफ्रिदीने या गादीवर बसताच याचे पडसाद पाकिस्तानच्या प्लेईंग इलेेवनमध्येही बघण्यात आला. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत अयशस्वी ठरलेल्या मोहम्मद रिझवान याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आणि त्याच्या ऐवजी सरफराज अहमद याला संधी देण्यात आली.
माजी कर्णधार सरफराज अहमद (Sarfaraj Ahmed) याने आपला शेवटचा कसोटी सामना जानेेवारी 2019मध्ये खेळला होता. त्यानंतर अनेक मालिकेेत तो संघाचा भाग होता, पण त्याला प्लेईंग इलेवनमध्ये जागा मिळाली नव्हती. मात्र, आता त्याला मोहम्मद रिझवान (Mohammed Rizwan) याच्या जागी संघात संधी मिळाली आहे. त्याबरोबर प्लेईंग इलेवनमध्ये मीर हमझा (Mir Hamza) याला देखील स्थान मिळाले आहे. कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याने सामन्याच्या आधीच स्पष्ट केले होते की शाहीद आफ्रिदी (Shahid Afridi) सल्ल्यावरच प्लेईंग इलेवनची घोषणा केली जाईल.
रिझवान मागच्या बऱ्याच काळापासून पाकिस्तानच्या कसोटी संघाचा भाग होता. मात्र, मर्यादित षटकांच्या सामन्यांसारखे प्रदर्शन कसोटीत करण्यात तो अपयशी ठरला. त्यामुळे त्याला प्लेईंग इलेवनमध्ये सामील करण्यावरुन नेहमीच चर्चांना उधाण येत असते. सध्या न्यूझीलंडचा कसोटी संघ दोन सामन्यांची मालिका खेळण्यासाठी पाकिस्तान दौऱ्यावर आला आहे.
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तानचा संघ-
अब्दुल्ला शफीक, इमाम उल हक, शान मसूद, बाबर आझम (कर्णधार), सउद शकील, सरफराज एहमद, आगा सलमान, नौमान अली, अबरार अहमद, मीर हमझा, मोहम्मद वसीम ज्युनिअर
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
याला काय म्हणावं आता! जेव्हा पाकिस्तानचा चिफ सिलेक्टरच करतो बॉल टेंपरिंग, संघ सहकाऱ्याने खोलले राज
ठरलं तर, श्रीलंकेविरुद्ध भारताचे कर्णधारपद हार्दिककडेच! व्हिडिओ आला समोर