क्रिकेट हा खेळ खूप रोमांचक मानला जातो. बऱ्याचदा मैदानावर खेळाडूंमध्ये वातावरण तापते, बाचाबाची देखील होते. त्याचबरोबर काही गमतीदार प्रसंग देखील घडत असतात, ज्यामुळे मैदानावरील दोन्ही संघात खेळी मेळीचे वातावरण राहते. असेच काहीसे घडले आहे, वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान दरम्यान सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात.
वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना सबिना पार्क येथे खेळला जात आहे. पाकिस्तानच्या पहिल्या डावादरम्यान संघाचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानने वेस्ट इंडिजच्या खेळाडूंमध्ये जाऊन असे कृत्य केले की, ज्यामुळे सर्वांना हसू आले.
या प्रसंगाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये मोहम्मद रिझवान वेस्ट इंडीजच्या खेळाडूंमध्ये ड्रिंक ब्रेक दरम्यान विचित्र गोष्ट करताना दिसला. व्हिडिओमध्ये मोहम्मद रिझवान वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना टिप्स देताना दिसत आहे. ज्यात तो आगळी वेगळी अशी गोलंदाजीची नक्कल करताना दिसतोय. हे पाहून सर्वांना हसू आवरणे अवघड होत आहे. समालोचकही त्याला हसत दाद देतांना दिसत आहे. मोहम्मद रिझवान हा गमतीदार आणि चांगला खेळाडू आहे, असेही समालोचक म्हणतांना दिसतो.
https://twitter.com/MahamOfficial_2/status/1429483186434740230?s=20
या सामन्यात रिझवानने पहिल्या डावात 115 चेंडूंचा सामना केला आणि 31 धावा केल्या. चांगली सुरुवात मिळाल्यानंतर त्याला जेसन होल्डरने त्रिफळाचीत केले.
दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानने पहिल्या डावात नऊ गडी गमावून 302 धावा केल्या. प्रतिउत्तरादाखल वेस्टइंडिज संघ 150 धावांवर सर्वबाद झाला. पाकिस्तानला 152 धावांची आघाडी मिळाली होती. पाकिस्तानने दुसऱ्या डावात सहा गडी गमावून 176 धावा केल्या. आता पाकिस्तानने वेस्टइंडिजला विजयासाठी 328 धावांचे लक्ष्य दिले आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा वेस्टइंडिजने एक गडी गमावून 49 धावा केल्या होत्या. त्यांना विजयासाठी 280 धावांची आवश्यकता आहे. दुसरीकडे पाकिस्तान झटपट गडी बाद करून विजय मिळवण्यासाठी उत्सुक असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
फवाद आलमच्या शतकामागे आईचा आशीर्वाद, सामन्यापूर्वी फोनवर म्हणाली होती असं काही
सूर्या-पृथ्वीची ‘३६० डिग्री’ फटकेबाजी पाहण्याची सर्वांनाच आतुरता, पण नेमकं कोणाच्या जागी खेळवणार?
तिसऱ्या कसोटीत ‘टेस्ट स्पेशलिस्ट’ पुजाराचा कटणार पत्ता? उपकर्णधार रहाणेने दिले ‘असे’ संकेत





