---Advertisement---

IND vs ENG: “बाकी गोलंदाजांनी बुमराहकडून शिका…” भारतीय संघाच्या गोलंदाजांवर भडकला ‘हा’ स्टार क्रिकेटर

On: शुक्रवार, जून 27, 2025 9:18 PM
---Advertisement---

Mohammed Shami On Team India Bowler’s: सध्या भारत आणि इंग्लंड संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यातील पहिला सामना लीड्सच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडने भारतीय संघाला 5 गडी राखून पराभवाची धूळ चाखायला लावली. लीड्सच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटीत भारताने इंग्लंडला चौथ्या डावात विजयासाठी 371 धावांचे लक्ष्य दिले होते, जे गोलंदाज पूर्णपणे वाचवू शकले नाहीत. या सामन्यात जसप्रीत बुमराह वगळता इतर भारतीय वेगवान गोलंदाजांनी निराश केले. ज्याबद्दल आता मोहम्मद शमीचेही वक्तव्य केले आहे. शमी सध्या या दौऱ्यासाठी पूर्णपणे फिट नसल्यामुळे संघाचा भाग नाही. (India vs England Test Series)

मोहम्मद शमीने लीड्स कसोटीतील भारताच्या पराभवानंतर आपल्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, “भारतीय संघातील इतर गोलंदाजांनी बुमराहशी बोलून त्याच्याकडून शिकले पाहिजे. त्याच्यासोबत नियोजन करून त्याला पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लीड्स कसोटीत जर इतर गोलंदाजांनी बुमराहला साथ दिली असती तर आम्ही तो सामना सहज जिंकू शकलो असतो. पहिल्या सामन्यातील पराभवाबद्दल बोलायचे झाल्यास, आम्हाला आमच्या गोलंदाजीत आणखी थोडी मेहनत करण्याची गरज आहे. दुसऱ्या डावात शार्दुलने सलग 2 विकेट्स घेतल्या, पण तोपर्यंत सामना भारतीय संघाच्या हातातून खूप दूर गेला होता. आम्हाला नवीन चेंडूने विकेट्स घेण्याची गरज आहे. इंग्लंडच्या पहिल्या कसोटीतील विजयाचे एक मोठे कारण हे देखील आहे की आम्ही त्यांना खूप सहजपणे धावा करू दिल्या.” (Mohammed Shami statement)

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा होणार होती तेव्हा सर्वांना अपेक्षा होती की त्यात मोहम्मद शमीचे नाव असेल, पण त्याची निवड झाली नाही. भारतीयस संघाचे मुख्य निवडकर्ता अजित अगरकर यांना शमीची निवड न करण्याचे कारण विचारले असता, त्यांनी तो पूर्णपणे फिट नसल्याचे स्पष्ट केले होते. इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाला आता मालिकेतील पुढील सामना 2 जुलैपासून एजबेस्टनच्या मैदानावर खेळायचा आहे, ज्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल अपेक्षित आहेत. (Ajit Agarkar On Mohammed Shami) दरम्यान काही मीडिया रिपोर्टनुसार भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा सामना खेळणार नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---