---Advertisement---

जसप्रीत बुमराहच्या टीकाकारांना मोहम्मद शमीने दिले उत्तर; म्हणाला…

---Advertisement---

नुकतीच भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे मालिका (India vs New Zealand ODI Series) पार पडली. ही मालिका न्यूझीलंडने 3-0ने जिंकत भारतीय संघाला व्हाईटव्हॉश दिला. या मालिकेत भारताचा दिग्गज वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) एकही विकेट मिळवता आली नाही. त्यामुळे बुमराह टीकाकारांच्या कचाट्यात सापडला. यावर आता भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammad Shami) बुमराहच्या टीकाकारांवर निशाना साधला आहे.

सेडन पार्क (Seddon Park), हॅमिल्टन (Hamilton) येथे न्यूझीलंड एकादश विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवसा अखेरीस टीकाकारांना उद्देशून शमी म्हणाला की, “मी समजू शकतो की आपण एकाच विषयावर चर्चा करत आहोत (ठरावीक कालावधीनंतर). ही फक्त 2-4 सामन्यांनंतरची गोष्ट नाही.  बुमराहने 2 सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली नाही म्हणून तुम्ही बुमराहच्या सामना जिंकून देण्याच्या क्षमतेला दुर्लक्षित करू शकत नाही.”

यावेळी शमीने टीकाकारांना सकारात्मकतेने विचार करा असे सांगितले आहे. तसेच बुमराहची कामगिरी लक्षात घेत शमी म्हणाला की, “भारतासाठी बुमराहने जे काही केले आहे ते तुम्ही कसे काय विसरू किंवा दुर्लक्षित करू शकता? त्यासाठी जर तुम्ही सकारात्मक विचार केला तर ते बुमराहसाठी आणि त्याच्या आत्मविश्वासासाठी चांगले असेल.”

बुमराहने आतापर्यंत 12 कसोटी, 64 वनडे आणि 49 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने कसोटीत 62 विकेट्स, वनडेत 104 विकेट्स आणि टी20त 59 विकेट्स घेतले आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---