नेपीयर। न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात आज पहिला वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद 157 धावा करत भारतासमोर विजयासाठी 158 धावांचे आव्हान ठेवले आहे.
भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद शमीने 3 विकेट्स घेतल्या आहेत. याबरोबरच शमीने खास विक्रमही केला आहे. त्याने वनडे क्रिकेटमध्ये 100 विकेट्स घेण्याचा टप्पा पार केला आहे. न्यूझीलंडचा स्पोटक सलामीवीर मार्टिन गप्टील शमीची 100 वी विकेट ठरला आहे.
याबरोबरच तो वनडेत सर्वात जलद 100 विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याने त्याच्या 56 व्या वनडे सामन्यात 100 विकेट्स घेण्याचा टप्पा पार केला आहे. याआधी हा विक्रम अष्टपैलू इरफान पठाणच्या नावावर होता. इरफानने 59 वनडे सामन्यात 100 विकेट्स घेण्याचा टप्पा पार केला होता.
तसेच शमी हा वनडेत सर्वात जलद 100 विकेट्स घेणारा जगातील सहाव्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे. त्याने न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टची बरोबरी केली आहे. बोल्टनेही 56 सामन्यात 100 वनडे विकेट्सचा टप्पा पार केला होता.
या यादीत अव्वल क्रमांकावर अफगाणिस्तानचा राशीद खान असून त्याने हा टप्पा 44 सामन्यातच पूर्ण केला होता.
शमीने आज चालू असलेल्या सामन्यात 6 षटकात 19 धावा देत 3 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने गप्टील, कॉलिन मुन्रो आणि मिशेल सँटेनरला बाद केले आहे.
वनडेत सर्वात जलद 100 विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज –
56 – मोहम्मद शमी
59 – इरफान पठाण
65 – झहीर खान
67 – अजीत अगरकर
68 – जवागल श्रीनाथ
वनडेत सर्वात जलद 100 विकेट्स घेणारे गोलंदाज –
44 – राशीद खान
52 – मिशेल स्टार्क
53 – साक्लेन मुश्ताक
54 – शेन बॉन्ड
55 – ब्रेट ली
56 – ट्रेट बोल्ट, मोहम्मद शमी
महत्त्वाच्या बातम्या-
–या भारतीय क्रिकेटपटूंनी न्यूझीलंडला त्यांच्याच देशात दिला आहे त्रास
–एवढी चांगली कामगिरी केलेल्या एमएस धोनी चाहत्यांसाठी ही आहे निराशाजनक बातमी
–क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच झाले असे फोटोसेशन, जाणून घ्या कारण