---Advertisement---

मोहम्मद शमी कमबॅकसाठी तयार, व्हिडिओ पोस्ट करून दिला निवड समितीला संदेश! आता तरी संधी मिळणार का?

On: बुधवार, जानेवारी 8, 2025 2:35 PM
Mohammed Shami
---Advertisement---

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी उत्सुक आहे. तो पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे त्याला पाच सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र, आता तो फिट होण्याच्या मार्गावर आहे. खुद्द मोहम्मद शमीनं निवडकर्त्यांना हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून पुन्हा गोलंदाजी सुरू केल्याची माहिती दिली.

मोहम्मद शमीला फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताकडून खेळायचं आहे. तो भारतासाठी शेवटचा सामना 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात खेळला होता. त्यानं संपूर्ण स्पर्धेत दमदार कामगिरी केली होती. यानंतर त्याच्या पायाला दुखापत झाली, ज्यातून सावरण्यासाठी त्याला सुमारे एक वर्ष लागलं. या दरम्यान तो आयपीएल आणि टी20 विश्वचषकाला मुकला.

शमीनं एका वर्षानंतर मैदानावर पुनरागमन केलं. तो रणजी ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळला, परंतु त्याला पुन्हा दुखापत झाली. त्यामुळे त्याला आणखी काही दिवस क्रिकेटपासून दूर राहावं लागलं. आता तो पुन्हा सरावासाठी परतला आहे. त्यानं नेट्समध्ये सराव करतानाचा एक व्हिडिओ ‘X’ वर पोस्ट केला. तुम्ही हा व्हिडिओ येथे पाहू शकता.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पूर्वी टीम इंडियाला मर्यादित षटकांचे 8 सामने खेळायचे आहेत. भारताला 22 जानेवारीपासून इंग्लंडविरुद्ध पाच टी20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. मोहम्मद शमीला या मालिकेत संधी मिळू शकते. मात्र, हे त्याच्या फिटनेसवर अवलंबून आहे. शमीनं जरी व्हिडीओ पोस्ट करून स्वत:ला तंदुरुस्त दाखवण्याचा प्रयत्न केला असला तरी वैद्यकीय पथकाशी चर्चा करून हा निर्णय घेतला जाईल.

भारतीय चाहते शमीच्या पुनरागमनाची आतुरतेनं वाट पाहत आहे. ऑस्ट्रेलियात झालेल्या बॉर्डर-गावस्कर मालिकेत टीम इंडियाला मोहम्मद शमीची उणीव भासली. या संपूर्ण मालिकेत बुमराहला दुसऱ्या टोकाकडून गोलंदाजीत साथ मिळाली नाही.

हेही वाचा – 

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी अफगाणिस्तानची मोठी खेळी, पाकिस्तानातही ‘भारतीय फॉर्म्युला’ आजमावणार
अरे देवा! कुठून सुरुवात करू?…या दोन भारतीय खेळाडूंबद्दल हे काय म्हणाले ॲलन डोनाल्ड?
भारतीय क्रिकेटमध्ये होणार मोठे बदल! निवड समितीला कठोर निर्णय घेण्याचा सल्ला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---