---Advertisement---

‘छोटा नाही, ३ वर्षांचा ब्रेक होता’, वनडेतील पुनरागमनाच्या प्रतिक्षेवर मोहम्मद शमी झाला व्यक्त

On: बुधवार, जुलै 13, 2022 11:06 PM
Mohammad-Shami
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात जबरदस्त प्रदर्शन केले. केनिंग्टन ओव्हल स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात त्याने संघाला उपयुक्त अशा विकेट्स मिळवून दिल्या. ज्यामुळे भारतीय संघ इंग्लंडला ११० धावांवरच रोखण्यात यशस्वी ठरला. गेल्या २ वर्षांनंतर शमीचा हा भारतीय संघाकडून पहिलाच वनडे सामना होता. आपल्या या पुनरागमनाच्या सामन्याबद्दल प्रतिक्रिया केली, तसेच बरेचसे उलगडेही केले.

‘बीसीसीआय टीव्ही’वर भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस महांब्रे यांच्याशी बोलताना शमीने बरेच खुलासे केले आहेत. शमीने त्याचा मागील वनडे सामना नोव्हेंबर २०२० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. त्यानंतर त्याला पुनरागमनासाठी जवळपास २ वर्षे वाट पाहावी लागली.

याबद्दल महांब्रेंना बोलताना शमी म्हणाला की, “हा काही छोटा ब्रेक नव्हता, हा ३ वर्षांचा ब्रेक होता. परंतु माझ्या डोक्यात याबद्दल काहीही चाललेले नव्हते. मी संघासोबत पूर्णपणे मिसळलो आहे. आम्ही एकत्र प्रवास करतो आणि जवळपास एका दशकापासून सोबत खेळत आहोत. प्रत्येकाला प्रत्येकाचे काम माहिती आहे. इतके क्रिकेट खेळल्यानंतरही जर तुमच्या मनात कोणता प्रश्न उपस्थित होत असेल, तर मला वाटते की, हे बरोबर नाही.”

इंग्लंडविरुद्धच्या पुनरागमनाच्या वनडे सामन्यातील प्रदर्शनाबाबत बोलताना शमी म्हणाला की, “स्पष्ट मानसिकतेसह मैदानावर उतरणे खूप महत्त्वाचे असते. कारण तुम्हाला आधीपासूनच माहिती असते की, काय करायची गरज आहे. तुम्हाला कुठे चेंडू टाकायचा आहे, पांढरा चेंडू कसा काम करतो अशा सर्व मूळ गोष्टी माहिती असतात. परंतु तुम्हाला मनातून धैर्य ठेवावे लागते आणि असे केल्यास तुम्ही कोणत्याही स्वरूपात खेळू शकता.”

पुढे बोलताना शमीने म्हटले की, “आम्ही गोलंदाजी करायला सुरुवात केली, तेव्हा चेंडू थांबून थांबून येत होता आणि सीम करत होता. त्यामुळे लाईन आणि लेंथवर नियंत्रण ठेवणे महत्त्वपूर्ण झाले होते. आम्ही आमचे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केले. अशाचप्रकारे मालिकेची सुरुवात व्हायला पाहिजे. हे एक उदाहरण आहे.”

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---