भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्यापासून वेगळी राहत असलेल्या त्याच्या पत्नीबद्दल खळबळजनक बातमी समोर येत आहे. शमीची पत्नी हसीन जहाँ ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र, यावेळी तिने शमीमुळे नाही, तर चालत्या ट्रेनमध्ये घडलेल्या गैरवर्तनामुळे सर्वांचे लक्ष वेधले आहे. हसीन जहाँ हिने रेल्वे तिकीट तपासणाऱ्या कर्मचाऱ्यावर गैरवर्तनाचा आरोप लावला आहे. चला संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया…
मोहम्मद शमी याची पत्नी हसीन जहाँ (Mohammed Shami Ex Wife Hasin Jahan) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून घडल्या प्रकाराबद्दल सांगितले. जहाँ म्हणाली की, ‘ती एका नातेवाईकाच्या लग्नात सामील होऊन बिहारवरून कोलकात्याला परत येत होती. यादरम्यान वाटेत कोलकाता जोगबनी एक्सप्रेसमध्ये तिला वरील सीट देण्यात आली. मात्र, खालील सीट रिकामीच होती. तसेच, दुसऱ्या प्रवाशाला विनंती केल्यानंतर ती खालच्या सीटवर बसली.’
https://www.instagram.com/reel/Cjt_d6Dg1Rt/?utm_source=ig_embed&ig_rid=36b84cb3-c3a9-4ea6-aefd-2cdce9b212fa
ती पुढे म्हणाली की, ‘यानंतर मालदा स्टेशनजवळ तिकीट तपासणाऱ्या कर्मचाऱ्याने तिच्यासोबत गैरवर्तन केले आणि तिच्याविरुद्ध शिवीगाळ केली.’ यानंतर तिने सविस्तर सांगितले की, ‘त्या कर्मचाऱ्याने तिचा मोबाईल फेकून दिला. पुढील स्टेशन फरक्का होते. तिथे तिची तक्रार नोंदवून घेण्यात आली. सध्या ती पोलीस संरक्षणात आहे. तसेच, ती या प्रकरणामुळे खूपच चिंतेत आहे.’ तिने असेही म्हटले की, ‘माहिती नाही सामान्य लोकांसोबत हे लोक कसा व्यवहार करत असतील.’
हसीन जहाँ (Hasin Jahan) ही मागील काही काळापासून इंस्टाग्रामवर चांगलीच सक्रिय राहते. ती आपले लेटेस्ट फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते. हसीनच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं, तर तिचे आणि शमीचे लग्न 2014मध्ये झाले होते. लग्नाच्या चार वर्षांनंतर त्यांच्या नात्यात फूट पडली. तिने शमीवर 2018 साली कौटुंबिक हिंसाचार आणि मॅच फिक्सिंगचे अनेक गंभीर आरोप लावले होते. दुसरीकडे, शमीबद्दल बोलायचं झालं, तर तो टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघात सामील झाला आहे. त्याला जसप्रीत बुमराह याच्या जागी ताफ्यात सामील केले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
महिला आशिया चषकात स्म्रीतीचा जलवा! फिफ्टी ठोकत नावावर केला जबरा विक्रम
जिंकलो रे! भारताने श्रीलंकेला लोळवलं, उंचावली महिला आशिया चषकाची सातवी ट्रॉफी