बीसीसीआयनं सोमवारी (23 डिसेंबर) भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या फिटनेसबाबत मोठं अपडेट जारी केलं. शमी टाचेच्या दुखापतीतून सावरला असल्याचं बीसीसीआयनं सांगितलं आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित कसोटी सामन्यासाठी तो अजूनही फिट नाही.
यासह शमीच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाला जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. शमी आता या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला जाणार नाही हे बीसीसीआयनं स्पष्ट केलं. बीसीसीआयनं सांगितलं की, त्यांच्या सेंटर ऑफ एक्सलन्सचे वैद्यकीय पथक मोहम्मद शमीच्या रिकव्हरी आणि रिहाबवर लक्ष ठेवून आहे. शमी टाचेच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरला आहे. मात्र तो कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी अजूनही पूर्णपणे फिट नाही.
बीसीसीआयनं आपल्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं, “नोव्हेंबरमध्ये मध्य प्रदेशविरुद्धच्या रणजी सामन्यात शमीनं बंगालसाठी 43 षटकं टाकली होती. त्यानं सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये नऊ सामने खेळले. यासोबतच त्यानं अनेक अतिरिक्त गोलंदाजी सत्रांमध्येही भाग घेतला. मात्र, गोलंदाजीच्या कामाचा ताण त्याच्या सांध्यावर पडला. त्यामुळे त्याच्या डाव्या गुडघ्यावर सूज आली आहे. असं होण्याची शक्यता आधीपासूनच होती कारण असं बरेच दिवस गोलंदाजी केल्यानंतर होतं.
यासोबतच शमीच्या सध्याच्या फिटनेसवर बीसीसीआयनं स्टेटमेंट दिलं आहे. मोहम्मद शमीचा गुडघा बरा होण्यासाठी आणि तो गोलंदाजीचा भार उचलण्यासाठी आणखी वेळ लागेल. या कारणामुळे तो बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या उर्वरित दोन सामन्यांसाठी तंदुरुस्त मानला गेला नसल्याचं बीसीसीआयनं स्पष्ट केलं.
मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबाबत बीसीसीआयकडून सध्या कोणतीही अंतिम मुदत देण्यात आलेली नाही. त्याचा विजय हजारे ट्रॉफीमधील सहभाग फिटनेस टेस्टवर अवलंबून असेल, असंही बोर्डानं स्पष्ट केलं.
हेही वाचा –
कर्णधार श्रेयस अय्यरने मुंबईची लाज राखली, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघासाठी ठोकला दावा!
16 चौकार, 11 षटकार…विजय हजारे ट्रॉफीमध्ये ‘ऋतु’चा राज! 200च्या स्ट्राईक रेटनं ठोकलं शतक
इशान किशनने ठोकले शानदार शतक! किशनसाठी भारतीय संघाचे दरवाजे उघडणार?