मोहम्मद शमी शेवटच्या वेळी 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यामध्ये मैदानात पहायला मिळाला होता. शमी या दिवसात दुखापतीमधून रिकव्हरी करत आहे. सध्या तरी वेगवान गोलंदाज भारतीय संघात कधी पुनरागमन करणार हे अद्याप तरी स्पष्ट नाहीये. मात्र, शमी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यापूर्वी देशांतर्गत क्रिकेट खेळू शकतो. देशांतर्गत क्रिकेट खेळल्यानंतर शमी टीम इंडियात परतणार आहे. भारतीय वेगवान गोलंदाज स्वत: देशांतर्गत क्रिकेट खेळण्याबाबत बोलला.
कोलकाता येथील ईस्ट बंगाल क्लबने शमीचा गौरव केला. या सत्कार समारंभात शमीने आपल्या पुनरागमनाबद्दल सांगितले. भारतीय वेगवान गोलंदाज म्हणाला, “मी केव्हा पुनरागमन करेन हे सांगणे कठीण आहे. मी खूप प्रयत्न करत आहे पण पुन्हा भारतीय जर्सी परिधान करण्यापूर्वी, तुम्ही मला बंगालच्या रंगात पहाल. मी बंगालसाठी 2-3 सामने खेळायला येईन. पूर्णपणे तयार होईन आणि त्यानंतर भारतीय संघात पुनरागमन करेन.
MOHAMMAD SHAMI WILL BE MAKING HIS COMEBACK!! 🇮🇳
– Shami will play a few matches for Bengal before making his return to the Indian team. 🫡 pic.twitter.com/IylMtoCQ4N
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 3, 2024
अलिकडेच काही दिवसांपूर्वी बीसीआय सचिव जय शाह यांनी केंद्रीय कराराचा भाग असलेल्या खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास सांगितले होते.
दुखापतीबद्दल पुढे बोलताना शमी म्हणाला, “दुखापत इतकी गंभीर असेल असे मला कधीच वाटले नव्हते. टी20 विश्वचषकानंतर टीम इंडियामध्ये परताण्याची अपेक्षा होती. पण ही दुखापत इतकी गंभीर असेल आणि ती बरी होण्यासाठी इतका वेळ लागेल याची डॉक्टरांनाही कल्पना नव्हती. वास्तविक एकदिवसीय विश्वचषकानंतर मोहम्मद शमीच्या टाचावर शस्त्रक्रिया करण्यात आले होते. महत्वाचं म्हणजे मोहम्मद शमी दुखापत असतानाही एकदिवसीय विश्वचषकात शानदार कामगिरी केला होता. त्याने केवळ 7 सामने खेळल्या होत्या. ज्यामध्ये तो 24 विकेट्स घेतल्या होत्या.
हेही वाचा-
भर ऑलिम्पिकमध्ये प्रेम व्यक्त, सुवर्णपदक विजेतीला सर्वांसमोर केलं प्रपोज; सुंदर VIDEO व्हायरल
IND VS SL: सामन्याचा सर्वात मोठा टर्निंग पॉईंट, अशा प्रकारे भारताने स्वतःच्या पायावरच कुऱ्हाड मारुन घेतले
भारत विरुद्ध श्रीलंका सामना टाय, मग सामनावीराचा पुरस्कार कोणाला मिळाला?