Mohammed Shami Injury: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे सतत मैदानापासून दूर आहे. विश्वचषकानंतर तो एकही सामना खेळलेला नाही आणि आताही त्याचे पुनरागमन अवघड आहे. वृत्तानुसार, मोहम्मद शमी अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नाही आणि तो इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमधून बाहेर पडू शकतो. शमीला एनसीएमध्ये फिटनेस टेस्टही द्यावी लागणार आहे.
जर आपण मोहम्मद शमी याच्याबद्दल बोललो तर तो विश्वचषकादरम्यानच दुखापतीचा बळी ठरला होता परंतु तो प्रत्येक सामन्यात सतत इंजेक्शन घेऊन खेळला. शमीने 2023 विश्वचषकातील सर्व सामने दुखपात असतानाही खेळले आणि 24 विकेट्सही घेतल्या. मात्र, विश्वचषक 2023 च्या फायनलनंतर शमीने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. तो भारतीय संघासोबत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरही गेला नाही. आगामी मालिकेत भारतीय संघाला त्याची कमी भासू शकते. (mohammed shami likely to miss 2 tests against england)
आता भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे आणि वृत्तानुसार शमी या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमधून बाहेर पडू शकतो. इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार, “मोहम्मद शमीने अद्याप गोलंदाजीला सुरुवातही केलेली नाही. सर्वप्रथम त्याला एनसीएमध्ये जाऊन फिटनेस सिद्ध करावा लागेल. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये खेळणे त्याच्यासाठी कठीण आहे.”
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. पहिला कसोटी सामना 25 जानेवारीपासून हैदराबादमध्ये तर दुसरा कसोटी सामना 2 फेब्रुवारीपासून विशाखापट्टणममध्ये खेळवला जाणार आहे. भारतीय संघाला या मालिकेत मोठा विजय मिळवायचा आहे, जेणेकरून त्यांना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी आपला दावा मजबूत करता येईल. (Shocking update on Mohammed Shami’s injury may be out of this big series)
हेही वाचा
Ball Tampering: भारताच्या दिग्गज गोलंदाजाची कबूली! पुर्वी सगळेच बॅाल कुरतडायचे, ‘पण पाकिस्तानी…’
Kieron Pollard: मुंबईच्या पोलार्डची वादग्रस्त इंस्टाग्राम पोस्ट, पाहा कुणावर साधलाय निशाणा