बीसीसीआयनं शुक्रवारी (25 ऑक्टोबर) प्रतिष्ठित बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा केली. मात्र या संघात वेगवान गोेलंदाज मोहम्मद शमी याला स्थान मिळालेलं नाही. यावरून आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शमी काही दिवसांपूर्वी नेट्समध्ये सराव करताना दिसला होता. तरीही त्याची संघात निवड झाली नाही. यामुळे आता चाहते टीम इंडियात सर्वकाही ठीक आहे की नाही? असा सवाल करत आहेत.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा होण्यापूर्वी शमीनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. व्हिडिओत तो नेट्समध्ये सराव करताना दिसला होता. यानंतर त्याची या मालिकेसाठी निवड होईल, असं बोललं जात होतं. परंतु तसं झालं नाही. आश्चर्याची बाब म्हणजे, बीसीसीआयनं शमीच्या दुखापतीबाबत अद्याप कोणतही अपडेट दिलेलं नाही.
बीसीसीआयनं बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसह दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जाणाऱ्या 4 सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी देखील भारतीय संघाची घोषणा केली. या टीममध्ये मयंक यादव, शिवम दुबे आणि रियान पराग यांना दुखापतीमुळे स्थान मिळालं नसल्याचं बीसीसीआयनं सांगितलं आहे. मात्र शमीच्या बाबतीत बोर्डानं असं कोणतंही अपडेट दिलेलं नाही.
मोहम्मद शमीनं भारतासाठी खेळलेला शेवटचा सामना 2023 विश्वचषकाचा अंतिम सामना होता. तेव्हापासून तो दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. शमीनं फेब्रुवारीमध्ये आपल्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया केली. तो अद्याप यातून सावरलेला नाही. न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी शमीच्या दुखापतीवर अपडेट देताना कर्णधार रोहित शर्मानं सांगितलं होतं की, शमीच्या गुडघ्यावर सूज आहे. त्यामुळे त्याची या मालिकेसाठी निवड झाली नाही. आता बोललं जात आहे की, याच कारणामुळे शमीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही संधी मिळालेली नाही.
हेही वाचा –
मयंक यादवसह या खेळाडूंना टी20 संघात स्थान नाही, बीसीसीआयने सांगितले मोठे कारण
IND vs NZ: टीम इंडिया अडचणीत, पुणे कसोटीसह मालिका गमावण्याचा धोका?
IND vs NZ: भारताला लाज वाचवायची असेल तर 16 वर्षांच्या या इतिहासाची पुनरावृत्ती करावी लागेल