Mohammed Shami :- भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा सध्या संघाच्या बाहेर आहे. वनडे विश्वचषकानंतर दुखापतीमुळे त्याने मोठा ब्रेक घेतलेला दिसतो. सध्या दुखापतीतून सावरत असतानाचा त्याचा एक व्हिडिओ समोर आला होता. तसेच, त्याने आता आपली मुलगी (Mohammed Shami Daughter) आयराच्या वाढदिवसानिमित्त देखील एक भावनिक पोस्ट केली आहे.
शमीची मुलगी आयरा हिचा 17 जुलै रोजी वाढदिवस असतो. त्याने आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली. मुलीच्या फोटोसहित त्याने एक भावनिक संदेश देखील लिहिला. ‘माझ्या छोट्या राजकुमारीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. तुझ्यासाठी हे वर्ष प्रेम, यश आणि आनंदाचे जावे.’
शमी याने 2014 मध्ये हसीन जहा हिच्यासोबत लग्न केले होते. त्यानंतर 2015 मध्ये आयरा हिचा जन्म झाला. मागील काही वर्षांपासून शमी व हसीन यांच्यामध्ये जोरदार खटके उडू लागले. हसीन हिने त्याच्यावर मॅच फिक्सिंग तसेच इतर मुलींशी संबंध असल्याचे आरोप केले. पुढे त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मुलगी आयरा हिची जबाबदारी हसीनकडे देण्यात आली. अधूनमधून हसीन अनेकदा मीडियासमोर येत वादग्रस्त विधाने करत असते.
View this post on Instagram
शमी हा 2023 वनडे विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला होता. त्याने प्रत्येक सामन्यात भारतीय संघाच्या विजयात योगदान दिले होते. मात्र, भारतीय संघाला या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागलेले.
विश्वचषकांनंतर शमी याने आपली सर्जरी करून घेतली. पायाच्या या सर्जरीमुळे तो अद्यापही मैदानापासून दूर आहे. या काळात आयपीएल 2024 मध्ये तो सहभागी होऊ शकला नाही. तसेच, टी20 विश्वचषक संघात देखील त्याचा समावेश झाला नव्हता. सध्या तो बेंगलोर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत रिहॅब करताना दिसतोय. काही दिवसांपूर्वीच त्याचा सराव करतानाचा एक व्हिडिओ दिसून आला. या वर्षाच्या अखेरीस भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. तोपर्यंत शमी तंदुरुस्त होऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तान बिघडवणार आयपीएल 2025 चा खेळ! ‘या’ बड्या संघाचे स्टार क्रिकेटपटू होऊ शकतात बाहेर
निवड समितीला हार्दिकचं प्रतित्युत्तर? पोस्ट शेअर करत दिले फिटनेसची झलक
पाकिस्तानच्या धमक्यांना घाबरले नाही बीसीसीआय! चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत मोठी अपडेट, भारत ‘या’ देशात खेळणार सामने