Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या आयोजनावरुन भरपूर वादंग सुरू आहे. यंदा चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे असून काही दिवसांपूर्वीच आयसीसीने पाकिस्तानने या स्पर्धेसाठी निश्चित केलेल्या वेळापत्रकाला हिरवा कंदील दाखवला होता. परंतु बीसीसीआय भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवण्याच्या विरोधात आहे. पाकिस्तान बोर्डाच्या धमक्यांनतरही बीसीसीआय आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे समोर आले आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, बीसीसीआय भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवायला अजूनही तयार नाही. त्यामुळे भारत पाकिस्तानमध्ये जाणार नसेल, तर चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने श्रीलंकामध्ये होऊ शकतात. आयसीसीची वार्षिक पत्रकार परिषद 19 जुलै रोजी कोलंबोत होणार आहे. या बैठकीत बीसीसीआय हायब्रीड मॉडेलचा विषय मांडू शकते.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ पाकिस्तानला पाठवण्याबाबत बीसीसीआय किंवा भारत सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. भारतीय संघ पाकिस्तानला जाण्याचा निर्णय फक्त भारत सरकारच्या हातात आहे, असे बीबीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी गेल्या महिन्यात स्पष्ट केले होते. अशातच, भारताने पाकिस्तानात न जाण्याचा निर्णय घेतल्यास चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने श्रीलंकेत होणार असल्याचं समोर आले आहे.
आयसीसीच्या वेळापत्रकानुसार भारताचे सामने लाहोरमध्ये होणार आहेत
दरम्यान आयसीसीच्या वेळापत्रकानुसार चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अ गटात भारताचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामध्ये यजमान पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेश यांचाही समावेश आहे. त्या वेळापत्रकानुसार भारतीय संघाचे सर्व सामने लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर (20 फेब्रुवारी वि. बांगलादेश, 23 फेब्रुवारी वि. न्यूझीलंड आणि 1 मार्च वि. पाकिस्तान)) होणार आहेत.
यापूर्वीही पाकिस्तानात जाण्यावरून वाद झाला होता
याआधी पाकिस्तानने 2023 च्या आशिया चषकाचे आयोजन केले होते, परंतु भारतीय संघाने शेजारी देशात जाण्यास स्पष्ट नकार दिला होता. परिणामी, आयसीसीने हायब्रीड मॉडेल सादर केले होते, ज्या अंतर्गत भारतीय संघाचे सर्व सामने श्रीलंकेत झाले होते. याच कारणामुळे आशिया चषक 2023 च्या उपांत्य आणि अंतिम सामन्यांचे यजमानपद पाकिस्तानला गमवावे लागले होते.
महत्वाच्या बातम्या-
एका फलंदाजामुळे दुसरा फलंदाज झेलबाद…! मजेशीर व्हिडिओ एकदा पाहाच
“मी इथे हरवलो आहे” शिखर धवनची इंस्टाग्राम पोस्ट जोरदार व्हायरल
“टी20 संघात विराट-रोहितची जागा कोणीही घेऊ शकत नाही”, कपिल देव असं का म्हणाले?