---Advertisement---

विश्वविजेत्या भारतीय प्रशिक्षकाचा श्रीलंकेला आधार; टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या पराभवानंतर श्रीलंकन बोर्डाचा मोठा निर्णय

On: सोमवार, मार्च 9, 2026 8:27 PM
---Advertisement---

टी-20 वर्ल्ड कप 2026 (ICC T20 international world cup 2026) मधील निराशाजनक कामगिरीनंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने एक मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक आणि दक्षिण आफ्रिकेचे दिग्गज फलंदाज गॅरी कर्स्टन (Gary Kirsten) यांची श्रीलंकेच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे, कर्स्टन हे सनथ जयसूर्या यांची जागा घेतील. नुकत्याच झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये श्रीलंका संघ सुपर-8 मधून बाहेर पडल्याने जयसूर्या यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

श्रीलंका क्रिकेट बोर्डाने गॅरी कर्स्टन यांच्यासोबत दोन वर्षांचा करार केला असून, ते 15 एप्रिलपासून आपल्या कामाला सुरुवात करतील. गॅरी कर्स्टन नुकत्याच पार पडलेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये नामीबिया संघाचे सल्लागार म्हणून काम पाहत होते. आता त्यांच्यासमोर सर्वात मोठे आव्हान पुढील वर्षी होणाऱ्या आयसीसी वनडे वर्ल्ड कपचे असेल. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामीबिया येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी श्रीलंकेला थेट पात्र (Qualify) करून देणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट असेल.

गॅरी कर्स्टन यांचा खेळाडू आणि प्रशिक्षक असा दोन्ही अनुभव दांडगा आहे. त्यांनी 101 कसोटी आणि 185 वनडे सामने खेळले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली
2011 मध्ये भारतीय संघाने वनडे वर्ल्ड कप जिंकला. भारतीय संघाने कसोटी क्रमवारीत पहिले स्थान पटकावले. त्यांनी दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानच्या संघालाही प्रशिक्षण दिले आहे. मात्र, पाकिस्तान बोर्डासोबतच्या मतभेदांमुळे त्यांनी तिथले पद लवकर सोडले होते.

गॅरी कर्स्टन यांनी आयपीएलमध्येही यशस्वी काम केले आहे. त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि गुजरात टायटन्स सोबत काम केले आहे. विशेष म्हणजे, 2022 मध्ये जेव्हा गुजरात टायटन्सने पहिल्याच प्रयत्नात विजेतेपद मिळवले, तेव्हा ते संघाचे फलंदाजी प्रशिक्षक होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---