बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला सुरुवात होण्यापूर्वी मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबाबत चर्चा सुरू होती. जरी तो या मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळवू शकला नाही, मात्र त्यानं देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं. आता तो ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी तयार असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, शमीनं 2023 एकदिवसीय विश्वचषकाच्या फायनलनंतर भारतासाठी एकही सामना खेळलेला नाही.
‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, टीम इंडियाची निवड समिती सध्या मोहम्मद शमीच्या फिटनेस चाचणीच्या निकालाची वाट पाहत आहे. टीम मॅनेजमेंट त्याला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघात समाविष्ट करू इच्छित आहे. बीसीसीआयनं यासाठी तयारी सुरू केली असून शमीचा व्हिसाही तयार असल्याचं या अहवालात म्हटलंय. एनसीएनं शमीला तंदुरुस्त घोषित केल्यानंतर त्याला लगेच ऑस्ट्रेलियाला पाठवलं जाऊ शकतं.
‘इंडियन एक्स्प्रेस’नं बीसीसीआयच्या एका सूत्राचा हवाला देऊन सांगितलं की, “निवड समिती एनसीएनं घेतलेल्या मोहम्मद शमीच्या फिटनेस चाचणीच्या निकालाची वाट पाहत आहे. शमी बंगळुरूला गेला आहे आणि त्यानं फिटनेस चाचणी दिली आहे. तो रणजी ट्रॉफी खेळला असून त्यानं सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही भाग घेतला होता. त्यानं दाखवून दिलं आहे की तो किती फिट आहे. शमी फिटनेस चाचणी उत्तीर्ण होताच त्याला ऑस्ट्रेलियाला पाठवलं जाईल.”
सध्या मालिकेत भारतीय संघ 1-0 ने आघाडीवर असला तरी ॲडलेड कसोटीत भारतीय संघाला शमीची उणीव भासत आहे. जसप्रीत बुमराह एका टोकावरून सातत्यानं विकेट घेत असला तरी त्याला दुसऱ्या टोकावरून मोहम्मद सिराजकडून पाहिजे तशी साथ मिळालेली नाही. यामुळे यजमान ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 157 धावांची मोठी आघाडी मिळाला. सध्या युवा हर्षित राणा संघाचा तिसरा मुख्य वेगवान गोलंदाज म्हणून खेळत आहे. मात्र ॲडलेड कसोटीत त्याची जोरदार पिटाई झाली.
हेही वाचा –
टीम इंडियासाठी चिंतेची बातमी! जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त होऊन मैदानावरच बसला
आधी सिक्स मग बोल्ड! ट्रॅव्हिस हेडला बोल्ड करताच सिराजचं आक्रमक सेलीब्रेशन, पाहा VIDEO
हा खेळाडू आहे कसोटीत भारताचा सर्वात मोठा ‘शत्रू’! आकडेवारी खूपच खतरनाक






