आतापर्यंत इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ८ संघ खेळताना दिसत होते. मात्र, आयपीएलच्या १५व्या हंगामात २ संघ नवीन जोडले गेले. ते म्हणजे लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स होय. या दोन संघांमुळे आता आयपीएलमध्ये १० संघ खेळताना दिसत आहेत. आयपीएलच्या १५व्या हंगामातील चौथा सामना याच दोन संघांमध्ये सोमवारी (२८ मार्च) मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर पार पडला. या सामन्यात गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांनी लखनऊ संघाच्या फलंदाजांची झोप उडवली. यादरम्यान गुजरातच्या गोलंदाजाने घेतलेल्या विकेटचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
झाले असे की, गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. यावेळी प्रथम फलंदाजी करण्यासाठी लखनऊ (Lucknow Super Giants) संघाकडून सलामीला कर्णधार केएल राहुल (KL Rahul) आणि क्विंटन डी कॉक (Quinton De Kock) हे फलंदाज आले होते. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर गुजरातच्या मोहम्मद शमीने (Mohammed Shami) राहुलची विकेट घेतली आणि त्याला तंबूत पाठवले. यानंतर शमीनेच तिसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर डी कॉकलाही तंबूचा रस्ता दाखवला. यावेळी तो ७ धावांवर खेळत होता. त्यानंतर गुजरातच्या वरुण ऍरॉनने फलंदाजीस आलेल्या लखनऊ संघाच्या एविन लुईसला १० धावांवर असताना शुबमन गिलच्या हातून झेलबाद केले.
मोहम्मद शमीने मनीष पांडेला केले त्रिफळाचीत
लखनऊ संघ पावरप्लेमध्येच दबावात येत होता. हा दबाव कमी करण्यासाठी फलंदाजीस लखनऊचा मनीष पांडे (Manish Pandey) आला होता. मात्र, पांडेला खास कामगिरी करता आली नाही. गुजरातकडून पाचवे षटक टाकण्यासाठी आलेल्या शमीने तिसऱ्याच चेंडूवर पांडेचा त्रिफळा उडवला. यावेळी पांडे ६ धावांवर खेळत होता. शमीने पांडेची विकेट घेतल्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
Shami to Pandey, OUT
Gem gem gem!Manish Pandey b Mohammed Shami 6 (5b 1×4 0x6) SR: 120. 🎯🎳 pic.twitter.com/Vdw69Vhjhp
— Live Cricket Master Updater (@MohsinM55415496) March 28, 2022
शमीने पहिल्यांदाच आयपीएलच्या पावरप्लेमध्ये घेतल्यात ३ विकेट्स
अशाप्रकारे पावरप्लेमध्येच लखनऊ संघाचे ४ फलंदाज तंबूत परतले होते. यात शमीच्या ३ विकेट्सचा समावेश होता. पावरप्लेमध्ये ३ विकेट्स घेण्याचा कारनामा शमीने पहिल्यांदाच केला. यामध्ये कर्णधार केएल राहुल, क्विंटन डी कॉक आणि मनीष पांडे या फलंदाजांची त्याने विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या-
व्हॉट अ स्टार्ट! शमीने सर्वांच्याच उंचावल्या भुवया, पहिल्याच चेंडूवर लखनऊचा कर्णधार ‘गोल्डन डक’
आयपीएलमध्ये इतक्या फ्रँचायझी, त्यांचे इतके बॉलर… पण शमीने गुजरातसाठी जे केले ते ऐतिहासिकच
ब्रेंडन मॅक्यूलम आणि केएल राहुल; दोघांच्याही नावावर मरेपर्यंत न विसरवता येणारा IPLचा ‘नकोसा विक्रम’