(ICC Champions Trophy 2025 Final) आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना 9 मार्च रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाईल. या सामन्यात भारतीय संघाचा दबदबा असल्याचे मानले जात आहे, त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे टीम इंडियाच्या गोलंदाजांचा उत्कृष्ट फॉर्म. आता, टीम इंडियाने या स्पर्धेत एकूण 4 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांना विरोधी संघाचा डाव गुंडाळण्यात यश आले आहे. दुबईच्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांनी आपले कौशल्य दाखवले, तर भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजांचेही वर्चस्व दिसून आले. ज्यामध्ये आतापर्यंत 4 सामने खेळलेल्या मोहम्मद शमीने 8 विकेट घेण्यात यश मिळवले आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात शमीच्या कामगिरीवर असतील. (Mohammed Shami Performance in Champions Trophy)
दरम्यान या स्पर्धेत सर्वाधिक बळी घेण्याबाबतीत मोहम्मद शमी दुसऱ्या क्रमकांवर आहे. त्याने 4 डावात 8 विकेट घेतल्या आहेत. तर अव्वल स्थानी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्नी आहे. त्याने 4 डावात 10 बळी घेतल्या आहेत. (Top Wicket Taker in ICC Champions Trophy 2025)
मीडिया रिपोर्ट्सनुसार मॅट हेन्नी अंतिम सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. त्याला सेमीफायनल सामन्यामध्ये दुखापत झाली होती. त्यामुळे याचा फायदा मोहम्मद शमीला होणार आहे, कारण हेन्नी या सामन्यात खेळला नाही, आणि जर मोहम्मद शमी तीन विकेट्स घेतल्यास तो सपर्धेत सर्वाधिक विकेट घेणार गोलंदाज बनू शकतो. त्यामुळे या कामगिरीमुळे त्याला गोल्डन बाॅल मिळू शकते. (Mohammed will win Golden Ball Champions Trophy 2025)
बऱ्याच काळानंतर मैदानात परतणाऱ्या मोहम्मद शमीच्या तंदुरुस्तीबद्दल सर्वांच्या मनात चिंता होती, पण शमीने प्रथम इंग्लंडविरुद्धच्या घरच्या मालिकेत आणि आता चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कामगिरी करून आपली तंदुरुस्ती सिद्ध केली. न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यांमध्ये मोहम्मद शमीचा उत्कृष्ट रेकॉर्ड आहे, ज्यामध्ये त्याची एकदिवसीय सामन्यांमध्ये गोलंदाजीची सरासरी 23.80 आहे तर न्यूझीलंडविरुद्ध ती 19.72 आहे. त्यामळे या चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये गोल्डन बाॅल जिंकू शकतो.
हेही वाचा-
या संघांनी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम टप्प्यात केल्या सर्वाधिक धावा! पाकिस्तान आहे अव्वलस्थानी
बीसीसीआयकडून श्रेयस अय्यरला मोठी संधी? सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये परत येणार?
‘खेळताना रोजा ठेवावा लागतो?’ शमीच्या वादात रोहितवर टीका करणारी शमा मोहम्मद उतरली!






