भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पंड्या मागच्या काही दिवसांपूर्वी चांगलाच चर्चेत आला होता. मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने इंडियन प्रीमियर लीग 2024 साठी त्याला संघात पुन्हा एकदा सामील केले. यासाठी फ्रँचायझीने मोठी रक्कम देखील खर्च केली. पण दुसरीकडे गुजरात टायटन्स संघाच्या अडचणी वाढल्या, अशा चर्चा सुरू आहेत. अशातच भारतीय संघ आणि गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याची मोठी प्रतिक्रिया समोर येत आहे.
हार्दिक पंड्या (Hardik Pandya) 2015 मध्ये पहिल्यांदा मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसला होता. त्याला या फ्रँचायझीने पदार्पणाची संधी दिली, जी त्याने आपल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर पुरेपूर वापरून घेतली. मुंबई इंडियन्सने जिंकलेल्या काही आयपीएल ट्रॉफींचा साक्षीदार हार्दिक पंड्या देखील होता. दरम्यानच्याच काळात हार्दिक भारतीय संघाचा महत्वाचा खेळाडू देखील बनला. असे असले तरी, आयपीएल 2022 पूर्वी झालेल्या खेळाडूंच्या लिलावात मुंबईने हार्दिकला उतरवले. लिलावात देखील त्याला खरेदी करणे मुंबईसाठी शक्य झाले नाही. कारण गुजरात टायटन्सने 15 कोटी रुपयांची बोली लावून हार्दिकला आपल्याकडे घेतले होते.
पहिल्याच हंगामात हार्दिक गुजरातचा कर्णधार बनला आणि संघाला विजेतेपद देखील जिंकून दिले. त्यानंतर मागच्या हंगामात त्याच्याच नेतृत्वात गुजरात टायटन्स संघ उपविजेता देखील ठरला. गुजरातसाठी आगामी हंगामात हार्दिक पुन्हा एकदा विजेतेपद मिळवण्याच्या प्रयत्नात दिसणार असा सर्वांचा अंदाज होता. पण ऐन वेळी कर्णधाराने गुजरातची साथ सोडली आणि आपला मुळ संघ असणाऱ्या मुंबई इंडियन्समध्ये परतला. हार्दिकच्या या निर्णायवर क्रीडाजगतात प्रचंड चर्चा झाली आहे. अशातच आता विश्वचषक 2023 मध्ये आपली छाप सोडणाऱ्या मोहम्मद शमी (Mohammed Shami) याचेही एक विधान व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत शमीला पत्रकार हार्दिकविषयी प्रश्न विचारतो. “हार्दिक पंड्या संघात नसताना गुजरात टायटन्स चांगले प्रदर्शन करू शकेल?” हा प्रश्न शमीला विचारला गेला. यावर शमीने एका वाक्यात उत्तर दिले की, “कोणाच्या जाण्याने काहीही फरक पडत नाही.”
Mohammed Shami reacts to Hardik Pandya leaving Gujarat Titans 😂 pic.twitter.com/lBALRQmI3y
— Sameer Allana (@HitmanCricket) January 16, 2024
दरम्यान, हार्दिक पंड्या आघामी आयपीएल हंगामात मुंभई इंडियन्सचा कर्णधार असणार आहे. याच पार्श्वभूमीवर रोहित शर्मा याचे चाहते मुंभई इंडियन्स आणि हार्दिक पंड्यावर नाराजी व्यक्त करताना दिसले आहेत. (Mohammed Shami’s statement on Hardik Pandya leaving Gujarat Titans)
महत्वाच्या बातम्या –
ICC Player Of The Month । अष्टपैलू खेळाडूने मारली बाजी, मिळालं डिसेंबमधील प्रदर्शनाचं बक्षीस
Team India । ‘या’ खेळाडूत आहे भारतासाठी पुढचा युवराज बनण्याची गुणवत्ता, स्वतः युवीनेच सांगितले नाव