मोहम्मद सिराज भारताचा वेगवान गोलंदाज. मोक्याच्या क्षणी आणि पॉवरप्लेमध्ये विरोधी संघाच्या फलंदाजांसाठी अडचण ठरणारा असा हा गोलंदाज. त्याने पुन्हा एकदा उत्तम सुरूवात करत भारताला पहिली विकेट मिळवून दिली. भारत विरुद्ध श्रीलंंका (INDvSL)यांच्यात मालिकेतील दुसरा वनडे सामना गुरुवारी (12 जानेवारी) खेळला गेला. कोलकाताच्या ईडन गार्डनवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात सिराजने श्रीलंकेचा सलामीवीर अविष्का फर्नांडो याला ज्याप्रकारे त्रिफळाचीत केले, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
या सामन्यात नाणेफेक जिंकत श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याला मोहम्मद सिराज (Mohammed Siraj)याने सुरुंग लावला. झाले असे की, नुवानिंदु फर्नांडो आणि अविष्का फर्नांडो (Avishka Fernando) यांनी संघाला संथ सुरूवात देत धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न केला. नंतर अविष्काने वेग वाढवत सिराजच्या एका षटकात लागोपाठ तीन चौकार मारले. सिराजनेही त्याचा बदला घेत पुढच्याच षटकात घेतला आणि अविष्काला क्लीन बोल्ड केले.
सिराजने श्रीलंकेच्या डावातील चौथे षटक टाकले ज्यामध्ये अविष्काने तीन चौकार मारले. तसेच अविष्का पहिल्याच षटकात बाद होता-होता वाचला. त्याला सिराजने सहाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बोल्ड केले. तो चेंडू कसा आत आला हे अविष्काला कळले देखील नाही. बाद झाल्यावर काही सेंकद तो तसाच उभा राहिला. त्याने 17 चेंडूत 4 चौकाराच्या साहाय्याने 20 धावा केल्या.
Classic Siraj in Powerplay. pic.twitter.com/jhyJfMFsAR
— Johns. (@CricCrazyJohns) January 12, 2023
दुसऱ्या वनडेसाठी दोन्ही संघाच्या अंतिम अकरामध्ये बदल दिसला. नुवानिंदुचा हा आंतरराष्ट्रीय पदार्पणाचा सामना होता. त्याला पथुम निसंका याच्याजागी संघात घेतले. तसेच दिलशान मदुशंकाच्या जागी लाहीरु कुमाराला संधी देण्यात आली. भारतातही युझवेंद्र चहलच्या जागी कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याला प्लेईंग इलेव्हनमध्ये घेतले.
या मालिकेतील पहिला सामना जिंकत भारत 1-0 असा आघाडीवर आहे. या मालिकेत आपले आव्हान कायम राखण्यासाठी आणि 2023च्या वनडे विश्वचषकास पात्र होण्यासाठी श्रीलंकेला विजय आवश्यक आहे. तर या स्पर्धेचे यजमानपद भारताकडे असल्याने ते आधीच पात्र झाले आहेत.
मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 15 जानेवारीला तिरुअंनतपुरमध्ये खेळला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीला हटवून विराटल हवी होती टीम इंडियाची कॅप्टन्सी! माजी प्रशिक्षकाच्या दाव्याने खळबळ
‘जय शाह सर…’, रणजीमध्ये विक्रमी खेळी केल्यानंतर पृथ्वी शॉचा बीसीसीआय सचिवांना रिप्लाय