---Advertisement---

सिराजपुढे बटलर निष्प्रभ! झोकदार ‘स्विंग’ने गुल केली दांडी, पाहा व्हिडिओ

On: रविवार, एप्रिल 23, 2023 6:58 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 32वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर वि. राजस्थान रॉयल्स संघात रंगला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीसाठी  फाफ डू प्लेसिस व ग्लेन मॅक्सवेल यांनी तुफानी फटकेबाजी केली. त्या दोघांच्या योगदानामुळे आरसीबीने 9 बाद 189 पर्यंत मजल मारली. या धावांचा पाठलाग करताना राजस्थानला चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती. मात्र, राजस्थानचा अनुभवी सलामीवीर जोस बटलर याला पहिल्याच षटकात मोहम्मद श्रीराज याने तंबूत पाठवले.

प्रथम फलंदाजीची संधी मिळालेल्या आरसीबीला पहिल्य चेंडूवर विराट कोहलीच्या रूपाने झटका बसला होता. मात्र, प्लेसिस व मॅक्सवेल यांनी तिसऱ्या विकेटसाठी आक्रमक 127 धावांची भागीदारी केली. दोघांनी अर्धशतक केल्याने आरसीबीला 189 पर्यंत मजल मारता आली.

 

विजयासाठी मिळालेल्या या मोठ्या लक्षाचा पाठलाग  करताना राजस्थानला चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती. राजस्थानचा प्रमुख सलामीवीर असलेल्या जोस बटलर याच्यावर संघाची मोठी भिस्त होती. मात्र, आरसीबीचा प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांनी राजस्थानच्या स्वप्नावर पाणी फेरले. त्याने पहिल्या षटकातील चौथ्या चेंडूवर बटलरचा त्रिफळा उडवला. बटलर दोन चेंडूत एकही धाव न करता माघारी परतला. मागील तीन सामन्यात बटलर दुसऱ्यांदा खाते खोलू शकला नाही.

(Mohammed Siraj Clean Bowled Jos Buttler RCBvRR)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

‘तो पंड्या नेतृत्वात स्मार्ट, पण लखनऊ…’, पराभवानंतर दिग्गजाने पुन्हा साधला राहुलवर निशाणा
संजूच्या ‘रॉयल्स’ने जिंकला टॉस, RCB संघ विराटच्याच नेतृत्वाखाली देणार ‘टॉपर’ला झुंज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---