---Advertisement---

माणुसकी जपावी तर कोहलीसारखी! लचक भरली असतानाही स्वीकारले होते सिराजच्या घरी जेवणाचे आमंत्रण

On: बुधवार, जून 23, 2021 6:35 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग(आयपीएल) मुळे  भारतीय संघाला खूप प्रतिभाशाली युवा खेळाडू मिळाले. त्यामुळेच आज भारतीय संघ एकाच वेळी दोन विदेशी दौरे करू शकतो. आज पूर्ण क्रिकेट विश्वात सर्वात जास्त युवा खेळाडू भारतीय संघाकडे आहेत. असाच आयपीएलमधून मोहम्मद सिराज देखील सर्वांसमोर आला. तो विराट कोहली कर्णधार रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून आयपीएलमध्ये खेळतो. नुकताच त्याने विराटबद्दल एक खास आठवण सांगितली आहे.

गेल्या दोन वर्षापासून सिराज आरसीबीसाठी प्रमुख खेळाडू ठरत आहे. तसेच गेल्या काही सामन्यांपासून तो भारतीय संघासाठीही मोलाची कामगिरी करत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सिराजने गॅबा कसोटीत शानदार कामगिरी केली होती. तसेच त्याची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संपूर्ण कसोटी मालिकेतच उत्तम कामगिरी झाली होती.

सिराजने या यशाचे श्रेय आपल्या घरच्यांना, आरसीबी संघ आणि कोहलीला दिले आहे. सिराजला कोहलीने एका भावासारखी मदत केली आहे, असे तो नेहमीच सांगत असतो. सिराजने कोहलीला २०१८ सालच्या आयपीएलमध्ये त्याच्या घरी बोलावले होते.

सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर सामन्यांदरम्यान, सिराजने कोहलीला आपल्या घरी बोलावले होते. कारण, सिराज हैदराबादमध्ये राहतो. त्यामुळे हैदराबाद आणि बेंगलोर सामन्यानंतर आरसीबीचे खेळाडू आणि कोहली सगळे सिराजच्या घरी गेले होते.

क्रिकबजसोबत बोलतना सिराजने सांगितले की, “घरी येण्याअगोदर कोहली भाईने मला सांगितले की, माझ्या कमरेत लचक भरली आहे. पण, कोहलीभाईने दिलेला शब्द पाळला आणि कोहली भाई माझ्या घरी आले. मी त्यांना घरी जेवण्यासाठी निमंत्रण दिले होते. ते खूप साधे आहेत. त्यांनी निमंत्रण लगेच स्वीकारलं.”

आरसीबी संघाने सिराजला २.६ करोडमध्ये विकत घेऊन पुन्हा आपल्या संघात स्थान दिलं. सिराज त्याचा गोलंदाजीवर सध्या खूप मेहनत करत आहे आणि त्याची मेहनत त्याचा गोलंदाजीतूनही दिसून येत आहे. त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे त्याला त्याला विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही स्थान दिले गेले आहे. परंतु, अंतिम सामन्यात त्याला अंतिम ११ मध्ये स्थान मिळवता आले नाही.

महत्त्वाच्या बातम्या – 

कोहलीचं ‘विराट’ मन! कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळत असलेल्या वॉटलिंगला भारताच्या कर्णधाराकडून खास शुभेच्छा

हजरातुल्लाहच्या वादळी खेळीपुढे इस्लामाबाद युनायटेड हतबल; पेशावर जाल्मीचा पीएसएल २०२१च्या फायनलमध्ये प्रवेश

…अन् चाहत्यांचे सेलिब्रेशन क्षणात बदलले निराशेत, पाहा कॅमेरामनने टिपलेला भन्नाट व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---