नुकत्याच झालेल्या 15व्या आशिया चषकात (Asia Cup)भारत-पाकिस्तान (INDvsPAK) यांच्यात बरोबरी राहिली. कारण या स्पर्धेत या दोन्ही संघांमध्ये दोन सामने खेळले गेले. पहिला सामना भारताने तर दुसरा सामना पाकिस्तानने जिंकला. मात्र काउंटी क्रिकेटमध्ये भारताची स्पीडगन पाकिस्तानवर भारी पडली. भारत-पाकिस्तान थरार इंग्लंडच्या काउंटी चॅम्पियनशीप डिविजन वनच्या एका सामन्यात पाहायला मिळाला. यामध्ये मोहम्मद सिराज आणि पाकिस्तानचा इमाम उल हक यांचा सहभाग आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) काउंटीमध्ये वॉर्विकशायर आणि पाकिस्तानचा सलामीवीर इमाम उल हक (Imam Ul Haq) समरसेटकडून खेळत आहेत. सामन्याच्या 10व्या षटकात सिराजचा सामना इमामशी झाला. सिराजने त्याला जबरदस्त बाद केले आहे. त्याने टाकलेला आउट स्विंगर जो ऑफ स्टंप्सबाहेर जात होता. इमामला त्याचा अंदाज आला नाही आणि त्याने बॅट फिरवली. पुढे त्याची खेळी समाप्त झाली. तो 20 चेंडूत एकही चौकार न मारता 5 धावांवर तंबूत परतला.
सिराजचा हा काउंटी क्रिकेटमधील पदार्पणाचा सामना आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात त्याने 19 षटकात 54 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. तर भारताच्या जयंत यादव याने 14 षटकात 42 धावा देत एक विकेट घेतली. समरसेटचा पहिला डाव 219 धावांवर संपुष्टात आला.
Miyan put in a brilliant shift on Day 1️⃣ for Warwickshire CCC as he picked up 4️⃣/5️⃣4️⃣ (19) against Somerset in the County Championship. 💪🏻
Spreading his magic in County Cricket! 🤩#PlayBold pic.twitter.com/899rvmJzZj
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) September 13, 2022
विशेष म्हणजे सिराज झिम्बाब्वेच्या दौऱ्यात भारतीय संघाचा भाग नव्हता. तसेच त्याला आशिया चषकातही घेतले नव्हते. यामुळेच त्याने काउंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला.
Siraj gets Imam-ul-Haq! 😍
Big wicket.
Match Centre 🖥 https://t.co/7qmT8n1G3L
🐻#YouBears | #WARvSOM pic.twitter.com/QDdM5uGxmb
— Warwickshire CCC 🏏 (@WarwickshireCCC) September 12, 2022
सिराजने 2017 मध्ये भारतीय संघात पदार्पण केला. भारत 2020मध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला असता त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने पहिल्याच सामन्यात मार्नस लॅम्बुशेन आणि कॅमेरून ग्रीन यांना बाद केले. मेलबर्न येथे झालेल्या या सामन्यात सिराजने एकूण 5 विकेट्स घेतल्या. हा सामना भारताने 8 विकेट्सने जिंकला. तर त्याने त्या दौऱ्यातील तीन सामन्यात 13 विकेट्स घेतल्या. यामुळे तो 2020-21च्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होता. तर भारताकडून तो सर्वाधिक विकेट्स घेणारा खेळाडू ठरला होता. भारताकडून त्याने आतापर्यंत 13 कसोटी सामन्यात खेळताना 40 विकेट्स घेतल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आता मैदानाबाहेरही विराटचीच हवा! इंस्टाग्रामपाठोपाठ बनला ‘ट्विटर किंग’
‘आता आली ना लाईनीवर’, उर्वशीने मागितली रिषभ पंतची माफी?
आता धवन फक्त ‘बदली कर्णधार’ म्हणूनच संघात सामील होणार का?