---Advertisement---

‘आता आली ना लाईनीवर’, उर्वशीने मागितली रिषभ पंतची माफी?

On: मंगळवार, सप्टेंबर 13, 2022 6:19 PM
Rishabh Pant and urvashi Rautela
---Advertisement---

संयुक्त अमिराती येथे पार पडलेला 15वा आशिया चषक भलताच हीट झाला. ही स्पर्धा भारतीय चाहते कधीच विसरणार नाही. कारण भारत लवकरच स्पर्धेबाहेर झाला आणि दोन खेळाडू चांगलेच चर्चेत आले. पहिला विराट कोहली आणि दुसरा रिषभ पंत. विराटने 1019 दिवसांनंतर शतकांचा दुष्काळ संपवला, तर पंत हा वेगळ्याच कारणाने चर्चेत आला. पंत आणि बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला यांच्यातील वाद हे त्याचे मुख्य कारण आहे. त्यातच भर म्हणजे आता तिने पंतची माफी देखील मागितली आहे.

झाले असे की, काही दिवसांपूर्वी उर्वशी रौतेला हिने रिषभ पंत (Rishabh Pant) याला छोटू भैया म्हटले होते. उर्वशीने पंतच्या इंस्टाग्राम स्टोरीचा फोटो ट्वीटमध्ये जोडताना ट्वीट करत लिहिले की, “छोटू भैयाने बॅट-बॉल खेळायला पाहिजे. मी कोणी मुन्नी नाही, जी तुझ्यासारख्या तरुण बालकासाठी बदनाम होईल.” याबरोबरच तिने हॅशटॅगमध्ये रिषभ पंत छोटू भैया असेही लिहिले होते.

पंतसोबत सोशल मीडियावर झालेल्या या वादाबाबत उर्वशीला एका मुलाखतीत ती आरपीला काही संदेश देऊ इच्छिते का? हा प्रश्न विचारला गेला. याचे उत्तर देताना ती म्हणाली, “सीधी बात नो बकवास. यामुळे मी काहीही विचित्र बोलणार नाही.” यानंतर तिला पुन्हा एकदा पंतला काही सांगायचे आहे का? कारण तुम्ही म्हणाला होता Forgive & Forget. त्यावर ती म्हणाली, “मी काही बोलणार नाही कारण मी हात जोडून माफी मागते. Sorry…I am Sorry.” यामध्ये तिने पंतचे नाव घेतले नसले तरी नेटकऱ्यांची काढायचा तो अर्थ काढला आहे.

उर्वशीच्या माफीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तर चाहत्यांच्याही यावर जबरदस्त कमेंट्स येत आहे. एकाने ‘आता आली ना लाईनवर’, तर दुसऱ्या युजरने लिहिले, ‘सगळे गोलमाल आहे.’

https://www.instagram.com/reel/Cib-gXwOMx7/?utm_source=ig_web_copy_link

पंत-उर्वशी वाद नेमका कसा झाला सुरू?

उर्वशीने एक मुलाखत दिली होती. त्यातून असे समोर आले होते की, पंत तिला भेटण्यासाठी दिल्लीला आला होता. पण तिला वेळ नसल्यामुळे पंतसोबत तिची भेट झाली नाही. उर्वशीने बोलताना रिषभ पंत (Rishabh Pant) याचे नाव जरी घेतले नसले तरी, नेटकऱ्यांनी काढायचा तो अर्थ काढला आहे. दरम्यान, रिषभ पंतनेही तिच्या या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिले. पंतच्या इंस्टाग्राम स्टोरिचा एक स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. नेटकऱ्यांच्या मते पंतने काही मिनिटांमध्येच ही स्टोरी डिलिट केली.

पंतच्या स्टोरीचा बदला म्हणून उर्वशी काय शांत बसेल. तिनेही पंतला छोटू भैया म्हटले होते. सध्यातरी उर्वशीने माफी मागितली आहे, आता यावर पंतची काय रिऍक्शन असेल हे लवकर कळेलच.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आता धवन‌ फक्त ‘बदली कर्णधार’ म्हणूनच संघात सामील होणार का?
रैना, इरफानने गायलेल्या गाण्यांवर युवीचा बेधुंद डान्स, हा व्हिडिओ नाही पाहिला तर काय पाहिले!
अर्शदीपच्या निवडीनंतर आईने दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “माझ्या मुलाने या वयात…”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---