---Advertisement---

मोहन बागानचीही ‘प्ले-ऑफ’मध्ये धडक; चेन्नईयनवर निसटता विजय

On: गुरूवार, मार्च 3, 2022 10:54 PM
---Advertisement---

गोवा: हैदराबाद एफसी आणि जमशेदपूर एफसी पाठोपाठ एटीके मोहन बागानने हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) आठव्या हंगामात दिमाखात प्ले-ऑफ फेरी नक्की केली. साखळी फेरीत गुरुवारी चेन्नईयन एफसीवर १-० अशी मात करताना १९ सामन्यांतून ३७ गुणांसह उपांत्य फेरी गाठली. जॉनी कौकाच्या पासवर रॉय क्रिश्ना याने केलेला एकमेव गोल निर्णायक ठरला.

मोहन बागानने सलग दुसरा आणि एकूण दहावा विजय नोंदवला. फॉर्मात असलेल्या एटीकेने सातत्य राखले तरी प्रतिस्पर्धी चेन्नईयनने त्यांना चांगलेच झुंजवले. ९० मिनिटांच्या खेळात मोहन बागानने अनेक सुरेख प्लान रचले तरी चेन्नईयनच्या बचावफळीने त्यांचे हल्ले परतवले. परंतु, मध्यंतराला काही सेकंद शिल्लक असताना डिफेंडर्सनी दाखवलेली ढिलाई चेन्नईयनला महागात पडली. प्रतिस्पर्ध्यांच्या विस्कळीत खेळाचा फायदा रॉय क्रिश्ना याने उठवला. जॉनी कौकाने चेंडूवर ताबा घेत चेन्नईयनच्या गोलपोस्टच्या दिशेने कूच केली. त्याच्या सुरेख पासवर रॉय क्रिश्नाने चेंडूला अचूक गोलजाळ्यात धाडले. यावेळी चेन्नईयनच्या गोलकीपरने डाइव्ह मारली. मात्र, चेंडूला रोखणे त्याला जमले नाही. पहिल्या सत्रातील आघाडीनंतर एटीकेचा आत्मविश्वास उंचावला. मध्यंतरानंतर त्यांनी भर टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. दुसरीकडे, पिछाडीवर पडलेल्या चेन्नईयनने बरोबरीसाठी प्रयत्नांची शिकस्त केली. परंतु, ते अपयशी ठरले.

फॉर्मात असलेल्या कौकाचा कालचा सामना हा आयएसएलमधील ५०वा सामना होता. निर्णायक गोलमध्ये सहभाग दाखवून त्याने त्याची सामन्यांची पन्नाशी संस्मरणीय केली. मोहन बागानने १९ सामन्यांतून ३७ गुणांसह अंतिम चार संघांमधील प्रवेश निश्चित केला. तसेच गुणतालिकेत थेट दुसऱ्या स्थानी झेप घेतली. चेन्नईयन एफसीसाठी आठवा हंगाम वाईट ठरला आहे. त्यांना आठव्या हंगामाचा शेवटही गोड करता आला नाही. त्यांचा १९ सामन्यांतील हा दहावा तसेच मागील आठ सामन्यांतील सहावा पराभव ठरला.

हैदराबाद एफसी आणि जमशेदपूर एफसी पाठोपाठ एटीके मोहन बागानने सेमीफायनल प्रवेश केल्याने चौथ्या क्रमांकावरील केरला ब्लास्टर्स एफसी (१९ सामन्यांत ३३ गुण) आणि मुंबई सिटी एफसीमध्ये (१९ सामन्यांत ३१ गुण) चौथ्या संघासाठी चुरस आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

केवळ ४ सामन्यांच्या अनुभववावर श्रीलंकेला चित करणार कर्णधार रोहित! पत्रकार परिषदेत म्हणाला…

मोहाली कसोटीसाठी श्रीलंकेच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल महत्त्वपूर्ण माहिती पुढे, बंदीनंतर ‘या’ खेळाडूचे पुनरागमन

दिपक चाहर पूर्ण हंगामातून बाहेर झाल्यानंतर सीएसकेपुढे असतील ‘हे’ ३ पर्याय, माजी क्रिकेटरने सांगितली नावे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---