नुकतेच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामन्यात भारतीय संघाला न्यूझीलंडकडून पराभवाला सामोरे जावे लागले. ज्यामुळे कर्णधार विराट कोहलीवर कडक शब्दांत सोशल मीडियातून टीका झाली आहे. मात्र, त्याचवेळी १९८३ विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य मोहिंदर अमरनाथ यांनी विराट कोहली आणि त्याच्या भारतीय संघाचे कौतुक केले. विराट कोहलीचे कौतुक करताना मोहिंदर अमरनाथ म्हणाले की, त्याच्यासारखे खेळाडू दशकांतून एकदाच भेटतात.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात झालेल्या पराभवानंतर विराटच्या कर्णधारपदावर देखील प्रश्न उपस्थित झाले होते. याबद्दल मोहिंदर अमरनाथ म्हणाले की “तो एक दिग्गज कर्णधार आणि खेळाडू आहे. आमच्या त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा असतात आणि जेव्हा ती अपेक्षा पूर्ण होत नाही, तेव्हा आपल्याला वाईट वाटते. ज्यामुळे आपण एखाद्या खेळाडूला दोष देतो. आपण भावनिक होऊ नये. विराट कोहलीसारखे खेळाडू दशकात एकदाच येतात.”
तसचे मोहिंदर अमरनाथ म्हणाले की विराट कोहलीमध्ये त्यांना दोन महान खेळाडूंचा चेहरा दिसतो. ते म्हणाले की “विराटमध्ये मला महान फलंदाज विव्हियन रिचर्ड्स आणि ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी कर्णधार रिकी पॉन्टिंगची झलक दिसते. यावरून आपण अंदाज लावू शकता की विराट कोहलीचा खेळाडू म्हणून कोणता स्तर आहे. तो महान खेळाडू आहे. तो आणखी पुढे खेळत असतानाच अधिक परिपक्व होईल आणि त्याचे नेतृत्व आणि फलंदाजी अजूनही सुधारत जाईल.”
भारतीय संघाने अंतिम सामन्यांत पहिल्या डावात केवळ २१७ धावा केल्या होत्या. त्याच्या प्रतिउतारात न्यूझीलंड संघाने पहिल्या डावात २४९ धावा केल्यात आणि ३२ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात फलंदाजी करत असताना भारतीय संघाने १७० धावा करत न्यूझीलंड संघाला विजयासाठी १३९ धावांचे लक्ष्य दिले. न्यूझीलंड संघाने हे लक्ष्य २ गडी गमावत ४६ षटकात सहज पूर्ण केले. या सामन्यात सामनावीर म्हणून काईल जेमिनसनला गौरविण्यात आले. त्याने या संपूर्ण सामन्यांत ७ गडी बाद केले आणि २१ धावा केल्या.
महत्वाच्या बातम्या
टी२० विश्वचषक आयोजनाबाबत बीसीसीआय सचिवांचे महत्त्वपूर्ण विधान, म्हणाले…
WTC फायनलमधील एकमेव खेळाडू ज्याला एक धाव, एक बळी आणि एक झेलदेखील घेण्यात आले अपयश
राष्ट्रीय संघाऐवजी आयपीएलची निवड करणार्या खेळाडूंवर भडकला वॉर्न, ‘ही’ कारवाई करण्याची मागणी