आयपीएल 2019 चा लिलाव जयपूरमध्ये आज(18 डिसेंबर) सुरु आहे. या लिलावात आत्तापर्यंत 28 खेळाडूंवर बोली लागली आहे. त्यातील गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जने एकाच खेळाडूला आत्तापर्यंत संघात घेतले आहे.
लिलावाआधी चेन्नईच्या संघात फक्त 2 जागा आणि 8.40 कोटी रुपये रक्कम शिल्लक असल्याने त्यांनी मोठी बोली लावलेली नाही. पण त्यांनी वेगवान गोलंदाजाला संघात घेण्यासाठी प्रयत्न केले होते. यामध्ये त्यांचे मोहित शर्माला संघात घेण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरले आहेत.
त्यांनी मोहितवर 5 कोटी रुपयांची बोली लावत त्याला संघात सामील करुन घेतले आहे. मोहित चेन्नईकडून याआधी 2013 ते 2015 पर्यंत खेळला आहे. पण त्यानंतर 2016 आणि 2017 या दोन वर्षांसाठी चेन्नईवर बंदी आल्याने तो पंजाब संघाकडून खेळला. पण पुन्हा एकदा चेन्नईने मोहितवर बोली लावत त्याला संघात घेतले आहे.
चेन्नईने आत्तापर्यंत महागडे ठरलेले वरुण चक्रवर्थी आणि जयदेव उनाडकटवरही बोली लावली होती. मात्र त्यांना संघात घेण्यात चेन्नईला अपयश आले.
महत्त्वाच्या बातम्या:
–मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आतापर्यंत हे ३ मोठे खेळाडू
–आयपीएल २०१९ लिलाव: युवराजसह या ५ महान खेळाडूंना नाही कुणीही वाली
–आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक बोली लागलेले टाॅप १० खेळाडू