पाकिस्तान क्रिकेट संघाने 1992मध्ये इंग्लंडला मेलबर्न क्रिकेट मैदानावर पराभूत करत पहिल्यांदा वनडे विश्वचषक आपल्या नावावर केला होता. यानंतर तब्बल 30 वर्षांनंतर विश्वचषक जिंकण्याची सुवर्णसंधी पाकिस्तान संघाकडे चालून आली होती. मात्र, या संधीचं सोनं करण्यात त्यांना अपयश आले. हातातोंडाशी आलेला विश्वचषक गेल्याने आता पाकिस्तान क्रिकेटमध्येही कर्णधार बदलाच्या हालचाली सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर याने पाकिस्तानचा पुढील कर्णधार कोण व्हावा याबाबत सुचक ट्विट केले आहे.
पाकिस्तान क्रिकेट संघाने विश्वचषकाच्या अंतिम फेरीचा प्रवास केला असला तरी, साखळी फेरीत त्यांची कामगिरी अपेक्षित अशी नव्हती. भारत आणि झिम्बाब्वेकडून पराभूत झाल्यानंतर त्यांच्यावर स्पर्धेतून बाहेर होण्याची टांगती तलवार होती. मात्र, त्यांनी अखेरचे तीन सामने जिंकात व नशिबाच्या जोरावर आधी उपांत्य व त्यानंतर अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र, त्यांना विश्वचषक जिंकण्यात अपयश आले.
https://twitter.com/iamamirofficial/status/1592144481415225349?t=l7RwwN2guWngOonHf2R29A&s=19
आता विश्वचषकानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याला बदलण्याची चर्चा होतेय. बाबर या विश्वचषकात अपेक्षित कामगिरी करू शकला नव्हता. टी20 क्रिकेटमध्ये आवश्यक असलेल्या स्ट्राइक रेटने त्याला धावा काढण्यात अपयश आलेले. नुकतेच पाकिस्तानातील एका पत्रकाराने मोहम्मद रिझवान, शादाब खान, शाहिन शाह आफ्रिदी व मोहम्मद हारिस यांची छायाचित्रे ट्विट करत प्रश्न विचारला होता की पाकिस्तानचा पुढील टी20 कर्णधार कोण असावा? त्यावर आमिरने आपले वजन शादाब खानच्या पारड्यात टाकले. शादाब सध्या पाकिस्तान संघाचा उपकर्णधार असून, त्याच्या अष्टपैलू कामगिरीने तो मागील पाच वर्षापासून संघाचा नियमित सदस्य देखील आहे.
(Mohmmad Amir Said Shadab Khan Will Next Pakistan T20 Captain)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एकीकडे पाकिस्तानी पत्रकाराचे ट्वीट, तर दुसरीकडे मिश्राजींचा ‘विराट’ रिप्लाय, ‘अशी’ केली बोलती बंद
विश्वचषक तर जिंकलाच, पण आता आयपीएलही जिंकायला निघाला इंग्लंडचा ‘हा’ पठ्ठ्या; म्हणाला, ‘मी आता…’






