आशिया चषक 2022 मधील चौथा सुपर फोर सामना अफगाणिस्तान व पाकिस्तान यांच्या दरम्यान खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानने शानदार गोलंदाजी करत अफगाणिस्तानचा डाव 129 धावांवर रोखला. साखळी फेरीत शानदार कामगिरी केलेल्या अफगाणिस्तानला सुपर फोरमध्ये मात्र अपयश आले. असे असले तरी संघाचा कर्णधार व अनुभवी अष्टपैलू मोहम्मद नबी याने या सामन्यात एक मोठी कामगिरी आपल्या नावे जमा केली.
अफगाणिस्तान क्रिकेटमधील सर्वात यशस्वी क्रिकेटर म्हणून मोहम्मद नबी याच्याकडे पाहिले जाते. अफगाणिस्तान क्रिकेटच्या सुरुवातीपासून तो आपले योगदान देत आला आहे. 37 वर्षीय नबी 2009 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतोय. त्याने आपल्या या 13 वर्षाच्या कारकिर्दीत आणखी एक सोन्याचे पान जोडले. नबी आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 100 सामने पूर्ण करणारा पहिला अफगान क्रिकेटपटू ठरला. तसेच आशिया खंडात अशी कामगिरी करणारा तो सातवा क्रिकेटपटू बनला.
Milestone Alert! 🚩
Our Skipper @MohammadNabi007 becomes the first Afghanistan player to play 💯 T20I matches 🔝
Go well Skipper, unlucky with the bat but wish you have a good outing with the ball in hand 👏👏#AfghanAtalan | #AsiaCup2022 | #AFGvPAK pic.twitter.com/xh3HveMbwz
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) September 7, 2022
नबीने आपल्या टी20 कारकिर्दीत आत्तापर्यंत 1662 धावा आणि 83 बळी देखील त्याच्या नावे जमा आहेत. तो बराच काळ टी20 अष्टपैलूंच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर होता. त्याने आपल्या वनडे कारकिर्दीत 133 सामने खेळताना 2913 धावा व 142 धावा केल्या आहेत. त्याने काही दिवसांपूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“वर्ल्डकपमध्ये हाच संघ खेळणार”; रोहितने दिले संघनिवडीबाबत रोखठोक उत्तर
भारत हरला तरीही रोहित अव्वलच! सचिनला मागे टाकत ठरलाय ‘अशी’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय
भारताच्या आशा जागृत ठेवणारी अफगाणिस्तान करणार पहिली फलंदाजी, वाचा प्लेइंग 11