---Advertisement---

VIDEO: वेदनेने विव्हळत असतानाही रिझवानने नाही सोडले मैदान; झुंजार वृत्तीचे केले जातेय कौतुक

On: मंगळवार, मार्च 8, 2022 6:19 PM
---Advertisement---

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना रावळपिंडीच्या मैदानावर खेळला गेला. फलंदाजांसाठी नंदनवन असलेल्या या खेळपट्टीवर पाच दिवसात मिळून तीन डावही पूर्ण झाले नाहीत. अखेरीस, हा सामना अनिर्णीत राहिला. मात्र, यादरम्यान पुन्हा एकदा पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानची झुंजार वृत्ती मैदानावर पाहायला मिळाली. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या सामन्याच्या चौथ्या दिवशी मोहम्मद रिझवान यष्टीरक्षण करताना खूप वेदनेत दिसत होता. पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांचे १४० किमी प्रतितास वेगाने येणारे चेंडू त्याच्या हातावर आदळत होते. ज्यामुळे तो मैदानावर अनेकदा हात दुखत असल्याचे दाखवताना दिसला होता. असे असतानाही त्याने दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी यष्टीरक्षण करणे बंद केले नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

 

या व्हायरल व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, रिझवानच्या हातावर आधी शाहीन शाह आफ्रिदी आणि नंतर नसीम शाहचे चेंडू आदळले. त्यानंतर हा यष्टीरक्षक फलंदाज मैदानावरच वेदनांनी ओरडताना दिसत आहे. मात्र, एवढे होऊनही त्याने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ग्लोव्हज काढले नाही.. त्यामुळेच आता चाहते सोशल मीडियावर रिझवानचे कौतुक करताना थकत नाहीत. या व्हिडिओला प्रचंड लाइक मिळताना दिसत आहेत.

तब्बल २४ वर्षांनंतर पाकिस्तान मध्ये कसोटी सामना खेळत असलेल्या ऑस्ट्रेलिया संघासाठी हा सामना तितकासा फायदेशीर ठरला नाही. पाकिस्तानी प्रथम फलंदाजी करताना इमाम उल हक व अझर अली यांच्या शतकाच्या जोरावर पावणे पाचशे धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरात उस्मान ख्वाजा, डेव्हिड वॉर्नर, मार्नस लॅब्युशेन व स्टीव स्मिथ यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ४५९ पर्यंत मजल मारली. पाकिस्तानसाठी दुसऱ्या डावात पुन्हा एकदा इमाम उल हक याने शतक ठोकले. तर, आपला केव्हा तिसरा सामना खेळणारे अब्दुल्ला शफिक याने देखील आपले पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. पाकिस्तानी दुसऱ्या डावात बिनबाद २५२ धावा केल्या असताना सामना संपवण्याचा निर्णय घेण्यात आला.

महत्वाच्या बातम्या-

 

Video: अर्धशतक ठोकल्यानंतर पाकिस्तानी कर्णधाराचे ‘बेबी सेलिब्रेशन’, विराटची करून दिली आठवण (mahasports.in)

पाकिस्तानी महिलांचा विश्वचषकात सलग दुसरा पराभव, ऑस्ट्रेलियाने ७ विकेट्सने मिळवला सोपा विजय (mahasports.in)

दीडशेपेक्षा जास्त धावा कुटल्यानंतर त्याच कसोटीत ८-९ विकेट्सही चटकावणारे अष्टपैलू, जडेजाचाही समावेश (mahasports.in)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---