रविवारी (22 ऑक्टोबर) विश्वचषक 2023 मधील 21वा सामना न्यूझीलंड आणि भारत यांच्यात चुरशीचा सामना खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना हिमाचल प्रदेशातील धरमशाला येथे होत आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. या सामन्यात मोहम्मद शमीला भारताकडून अंतिम 11मध्ये स्थान मिळाले. शार्दुल ठाकूरच्या जागी तो संघात आला आहे. शमीने या सामन्यात अप्रतिम पुनरागमन केले आणि पहिल्याच चेंडूवर किवी संघाचा सलामीवीर विल यंगला बोल्ड केले.
मोहम्मद शमी (Mohammad Shami) याच्यासाठी ही विकेट खूप खास होती. कारण या विकेट्ससह तो विश्वचषकाच्या इतिहासात भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसरा गोलंदाज बनला आहे.
धरमशाला येथे सुरू असलेल्या सामन्यात विल यंग हा मोहम्मद शमीचा 32 वा बळी ठरला आहे. शमीने भारतीय संघाचा माजी दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळे (Anil Kumble) याला मागे टाकले आहे. त्याने विश्वचषकात एकूण 36 विकेट्स घेतल्या आहेत. कुंबळेने विश्वचषकात भारताकडून 31 विकेट्स घेतल्या होत्या. या यादीत झहीर खानचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने आपल्या आंतराष्ट्रीय कारकिर्दीत विश्वचषकात 44 विकेट्स घेतल्या आहेत. जहीर खान (Zahir Khan) सोबत जवागल श्रीनाथ (Javagal Srinath) हाही संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने आपल्या आंतराष्ट्रीय कारकिर्दीत 44 विकेट्स घेतल्या आहेत.
मोहम्मद शमी पहिल्यांदाच 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाकडून खेळण्यासाठी मैदानात आला आहे. यापूर्वी त्याला अंतिम 11 मध्ये स्थान मिळाले नव्हते. शमीने आपल्या पहिल्याच सामन्यात शानदार सुरुवात केली आहे. या सामन्यात मोहम्मद शमीने भारताकडून सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या आहेत. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने निर्धारित षटकात सर्वबाद 273 धावसंख्या उभारली आहे. न्यूझीलंडकडून डॅरिल मिचेल (Daryl Mitchell) याने सर्वाधिक 130 धावा केल्या.
(Mohmmad Shami Becomes Third Highest Wicket Taker In World Cup For India)
महत्वाच्या बातम्या –
मिचेलने सावरला न्यूझीलंडचा डाव! धरमशालेत दिला टीम इंडियाला शतकी घाव
मोठी बातमी! विराटच्या माजी सहकाऱ्याने क्रिकेटला ठोकला रामराम, लगेच वाचा