---Advertisement---

मिचेलने सावरला न्यूझीलंडचा डाव! धरमशालेत दिला टीम इंडियाला शतकी घाव

---Advertisement---

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत रविवारी (22 ऑक्टोबर) भारत आणि न्यूझीलंड हे संघ आमने-सामने आले. धरमशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. दोन्ही सलामीवीर पहिल्या दहा षटकात तंबूत परतल्यानंतर अनुभवी डेरिल मिचेल याने आपला दर्जा दाखवून दिला. त्याने भारतीय गोलंदाजांचा शानदार पद्धतीने सामना करत विश्वचषकातील आपले पहिले शतक पूर्ण केले.

भारतीय गोलंदाजांनी पहिल्या दहा षटकात पाहुण्या संढावर पूर्णपणे वर्चस्व गाजवले होते. त्यांचे दोन्ही सलामीवीर तंबूत परतले. मात्र, युवा रचिन रवींद्र व डेरिल मिचेल यांनी फारसा दबाव न घेता आपला डाव सावरला. सुरुवातीला संयम दाखवल्यानंतर त्यांनी आक्रमक धोरण स्वीकारत वेगाने धावा काढल्या. तिसऱ्या गड्यासाठी त्यांनी दिडशतक भागीदारी केली. रचिन 75 धावा करून बाद झाल्यानंतर मिचल याने आपली खेळी अशीच सुरु ठेवली.

त्याने आपल्या वनडे कारकीर्दीतील पाचवे व विश्वचषकातील पहिले शतक पूर्ण करण्यासाठी शंभर चेंडू घेतले. यामध्ये सात चौकार व चार षटकारांचा समावेश होता.

(Newzealand Saviour Daryl Mitchell Hits Century Against India In ODI World Cup)

हेही वाचा-
क्या बात है! अवघ्या 9 धावांवर न्यूझीलंडला बसला पहिला धक्का, सिराजने ‘असा’ काढला कॉनवेचा काटा
IND vs NZ Toss: महत्त्वाच्या सामन्यात रोहितने जिंकली नाणेफेक, पंड्यासह ‘या’ खेळाडूला केलं संघाबाहेर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---