भारतीय क्रिकेट संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. हा दौरा छोटेखानी असला तरी या दौऱ्यावर आपला मजबूत संघ बीसीसीआयने पाठवला होता. मात्र, वनडे मालिकेतील पहिले दोन्ही सामने भारताला गमवावे लागले. असे असतानाच खेळाडूंच्या दुखापतींनी देखील बीसीसीआय व संघ व्यवस्थापन त्रस्त आहे. वनडे मालिकेतून बाहेर झालेला अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा आता कसोटी मालिकेला देखील मुकण्याची शक्यता आहे.
भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज असलेला मोहम्मद शमी टी20 विश्वचषकानंतर कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. त्याला न्यूझीलंड दौऱ्यावर आराम देण्यात आलेला. तर, बांगलादेश दौऱ्यासाठी त्याची निवड केली गेलेली. मात्र, संघ बांगलादेशला रवाना होण्यापूर्वीच तो दुखापतग्रस्त झाला व वनडे मालिकेतून बाहेर पडला. आता तो कसोटी मालिकेतूनही बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एका क्रिकेट संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, दुखापतग्रस्त असलेला शमी अद्याप त्याच्या दुखापतीतून सावरलेला नाही. शमी सध्या बेंगलोर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी पुनर्वसन करत आहे. तो अजूनही कसोटी सामना खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने बांगलादेशला जाणार नाही.
भारतीय संघ दुखापतींमुळे चांगला अडचणीत सापडलेला दिसून येतो. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह व अष्टपैलू रवींद्र जडेजा हे मागील बऱ्याच काळापासून दुखापतीमुळे संघाचा भाग नाहीत. तर, वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा याला देखील दुखापत झाली आहे. रोहित मायदेशी परतला असून, कसोटी मालिकेत तो सहभागी होणार की नाही, हे निश्चित नाही.
बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर , मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज व उमेश यादव.
(Mohmmad Shami Could Be Ruled Out From Test Series Against Bangladesh)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंग्लंडला पाकिस्तानचा ‘हा’ गोलंदाज स्वप्नातही आठवेल! पदार्पणाच्या सामन्यातच अर्धा संघ धाडला तंबूत
“आता बुमराह-शमीच्या पुढे पाहायची वेळ आलीये”






