---Advertisement---

चालू वर्षावर सिराजचेच राज! आकडेवारी पाहून म्हणाल “वर्ल्डकपला हाच हवा”

On: मंगळवार, ऑक्टोबर 11, 2022 6:47 PM
Mohammed Siraj
---Advertisement---

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरचा सामना दिल्ली येथे खेळला गेला. पहिल्या दोन सामन्यांनंतर मालिका बरोबरीत असल्याने हा सामना निर्णायक ठरला. यजमान भारतीय संघाने एकतर्फी सामन्यात विजय मिळवत मालिका आपल्या नावे केली. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेला 27.1 षटकात 99 धावांवर सर्वबाद केले होते. या संपूर्ण मालिकेत भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद सिराजने जबाबदारी सांभाळली. केवळ या मालिकेतच नव्हे तर संपूर्ण वर्षभरात सिराजने वनडे क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व गाजवले आहे.

सिराजने या सामन्यात 5 षटकात 17 धावा देत जानेमन मलान‌ व रिझा हेन्रिंक्स यांना बाद केले. मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही त्याने तीन बळी घेत भारताच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली होती.

चालू वर्षात सिराजच्या कामगिरीचे मूल्यांकन करायचे झाल्यास, त्याने 12 सामने खेळताना 18 बळी मिळवले आहेत. विशेष म्हणजे यादरम्यान त्याची इकॉनॉमी केवळ 4.46 अशी मामुली राहिली आहे. या बारा सामन्यांपैकी एका सामन्यात त्याला 6 पेक्षा जास्तच्या इकॉनॉमी रेटने धावा निघाल्या आहेत. विशेष म्हणजे हे वर्ष सुरू होण्याआधी सिराजने भारतासाठी केवळ एक वनडे सामना खेळला होता.

सिराजच्या या सातत्यपूर्ण कामगिरीनंतर त्याला टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळावे अशी अपेक्षा चाहते व्यक्त करत आहेत. भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी मोहम्मद शमी व दीपक चहर यांची वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. मात्र, हे दोन्ही खेळाडू देखील थोड्याफार तंदुरुस्तीशी झुंजताना दिसतायेत. त्यामुळे अनेक माजी क्रिकेटपटूंनी देखील चांगल्या फॉर्ममधून चाललेला सिराज विश्वचषकात संधी मिळवण्यासाठी पात्र असल्याचे म्हटले आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सिराज-सुंदरनंतर कुलदीप शो! यादवसाठी दुसऱ्या क्रमांकाचा ‘वनडे स्पेशल’ संघ दक्षिण आफ्रिका, पहिल्या…
कार्तिकनंतर ‘हा’ असणार टीम इंडियाचा फिनिशर? संघ व्यवस्थापनाने आताच दिली जबाबदारी
कॅप्टन रोहितचा संघ टी20 वर्ल्डकपनंतर ‘या’ संघाच्या दौऱ्यावर जाणार, पाहा संपूर्ण स्केड्युल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---