ऑस्ट्रेलियात सुरू झालेल्या टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ सज्ज आहे. विश्वचषकापूर्वीच्या अधिकृत सराव सामन्यां आधी भारतीय संघाने वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामने खेळले. आता ब्रिस्बेन येथे भारतीय संघ यजमान ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडविरुद्ध सराव सामने खेळणार आहे. भारतीय संघ आधीच ब्रिस्बेन नेते पोहोचला असताना, भारतीय संघाच्या राखीव खेळाडूंमध्ये सामील झालेला मोहम्मद सिराज हादेखील ऑस्ट्रेलियाला पोहोचला.
मोहम्मद सिराज हा नुकताच ब्रिस्बेन विमानतळावर उतरला. त्याने आपली इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट करत याबाबत माहिती दिली. त्याने पोस्ट केलेल्या स्टोरीमध्ये ब्रिस्बेन विमानतळ दिसून येत आहे.
मोहम्मद सिराज हा काही दिवसांआधी भारतीय टी20 संघाच्या आसपासही नव्हता. मात्र, विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झालेल्या जसप्रीत बुमराहला दुखापतीमुळे विश्वचषकातून माघार घ्यावी लागली. त्यावेळी भारतीय संघात राखीव म्हणून मोहम्मद शमी व दीपक शहर यांचे नाव होते. अशातच सिराजने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेत शानदार कामगिरी करत मालिकावीर पुरस्कार पटकावला. त्यामुळे त्याला बुमराहचा पर्याय म्हणून भारतीय संघात निवडावे अशी मागणी पुढे येऊ लागली.
मोहम्मद शमी पूर्णपणे तंदुरुस्त झाल्याने त्याचा मुख्य संघात समावेश केला गेला. दीपक चहरही दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाला जाणार नसल्याचे समोर आल्यानंतर सिराजचा भारताच्या राखीव खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला. त्यामुळे तो आता भारतीय संघाच्या नेट्समध्ये दिसेल. सोबतच एखादा भारतीय गोलंदाज दुखापतग्रस्त झाल्यास सिराजची मुख्य संघात वर्णी लागू शकते.
विश्वचषकासाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.
राखीव खेळाडू- मोहम्मद सिराज, रवी बिश्नोई, श्रेयस अय्यर.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात नेदरलँड्सचा दमदार विजय, यूएईचा 3 विकेट्सने पराभव
नादच खुळा! 11 वर्षीय चिमुकल्याच्या बॉलिंगचा रोहित बनला फॅन, नेट्समध्ये केला त्याचा सामना