भारत विरुद्ध श्रीलंंका (INDvSL) यांच्यात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा वनडे सामना गुरुवारी (12 जानेवारी) खेळला गेला. नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघाला या सामन्यात गोलंदाजीची संधी मिळाली. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत श्रीलंकेला 215 धावांवर गुंडाळले. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने याने अप्रतिम गोलंदाज करताना तीन बळी आपल्या नावे केले. त्याचबरोबर मागील दोन वर्षात आपणच भारतीय संघाचे सर्वोत्कृष्ट गोलंदाज असल्याचे त्याने सिद्ध केले.
जसप्रीत बुमराह याच्या अनुपस्थितीत सिराज भारतीय संघासाठी नवा चेंडू हाताळताना दिसतोय. कोलकाता वनडेतही त्याने भारताला पहिले यश मिळवून दिले. त्याने अविष्का फर्नांडो याला त्रिफळाचित केले. त्यानंतर नवव्या गड्यासाठी श्रीलंकेच्या फलंदाजांनी 43 धावांची भागीदारी केली असताना त्याने एकाच षटकात दोन गडी बात करत श्रीलंकेचा डाव संपवला. त्याने अवघ्या 5.4 षटकात 30 धावांमध्ये तीन गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला. पहिल्या सामन्यातही त्याने श्रीलंकेच्या दोन गड्यांना बाद केलेले.
सिराज हा 2021 पासून वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. त्याने आत्तापर्यंत 29 बळी आपल्या नावे केले आहेत. त्याचबरोबर शार्दुल ठाकूर याने देखील तितकेच बळी आपल्या नावे केलेत. त्यानंतर फिरकीपटू युझवेंद्र चहल व प्रसिद्ध कृष्णा यांचा क्रमांक लागतो. त्यांनी अनुक्रमे 27 व 25 बळी टिपले आहेत. याच सामन्यात तीन बळी घेणारा कुलदीप यादव हा या यादीमध्ये 17 बळींसह पाचव्या स्थानी आला आहे.
याच वर्षी होत असलेल्या वनडे विश्वचषकाच्या दृष्टीने भारतीय गोलंदाजी अधिक सक्षम बनवण्याकडे संघ व्यवस्थापनाचा कल आहे. जसप्रीत बुमराह याच्यासह आणखी कोण वेगवान गोलंदाजीचा भार विश्वचषकात वाहतात हे पाहणे रंजक ठरेल.
(Mohmmad Siraj Take Most Wickets For India In ODI Since 2021)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीला हटवून विराटल हवी होती टीम इंडियाची कॅप्टन्सी! माजी प्रशिक्षकाच्या दाव्याने खळबळ
‘जय शाह सर…’, रणजीमध्ये विक्रमी खेळी केल्यानंतर पृथ्वी शॉचा बीसीसीआय सचिवांना रिप्लाय