---Advertisement---

विराटच्या ‘बॅडपॅच’वर पाकिस्तानी दिग्गजाकडून सबुरीचा सल्ला; म्हणाला…

On: सोमवार, जुलै 18, 2022 3:55 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा नुकताच समाप्त झाला. एकमेव कसोटीत भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला‌‌. त्यामुळे मागील वर्षी सुरू झालेली ही कसोटी मालिका २-२ अशा बरोबरीत संपली. त्यानंतर टी२० व वनडे मालिकेत भारतीय संघाने यजमान इंग्लंडला पराभूत केले. भारतीय संघाची कामगिरी उत्कृष्ट झाली असली तरी, संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू व माजी कर्णधार विराट कोहली याचे अपयश कायम राहिले. त्यानंतर अनेकांनी त्याच्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद युसुफ याचे देखील नाव जोडले गेले आहे.

विराटचा खराब फॉर्म कायम

विराट कोहली मागील काही काळापासून खराब फॉर्ममधून जात आहे. आजवर ७० आंतरराष्ट्रीय शतके नावावर असलेल्या विराटला आपले ७१ वे शतक पूर्ण करण्यासाठी नोव्हेंबर २०१९ पासून प्रतीक्षा करावी लागत आहे. त्याचा फॉर्म इतपत खराब आहे की, मागील पाच वनडे डावांमध्ये तो वीस धावा देखील बनवू शकला नाही. आगामी वेस्टइंडीज दौऱ्यावर देखील त्याला संघात स्थान दिले गेले नाही. परंतु, त्यासाठी निवड समितीने विश्रांतीचे कारण दिले आहे.

पाकिस्तानी दिग्गजाने दिली प्रतिक्रिया

विराटच्या या खराब कामगिरीनंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद युसुफ व्यक्त झाला. तो म्हणाला, “विराट महान खेळाडू आहे. मागील दहा वर्षात तो सातत्याने चांगली कामगिरी करतोय.‌ सध्या विराट ज्या वाईट टप्प्यातून जात आहे, ते क्रिकेटपटू म्हणून घडते. परंतु लोक ज्याप्रकारे त्याच्याबद्दल सतत बोलत आहेत, त्यामुळे त्याच्यावरील दबाव आणखी वाढेल.”

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

विराटने घेतली विश्रांती

विराट खराब फॉर्ममध्ये असला तरी त्याने खेळणे कायम ठेवले नाही. त्याने वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे व टी२० मालिकेतून माघार घेतलीये‌. या कालावधीत तो लंडनमध्ये आपल्या कुटुंबासह वेळ घालवेल.

महत्त्वाच्या बातम्या-

हा शुद्ध वेडेपणा! शतक पूर्ण होताच रिषभ पंतने इंग्लंडच्या गोलंदाजांना धरलं धारेवर, पाहा व्हिडिओ 

दिल्लीच्या पठ्ठ्यांनी महाराष्ट्राच्या गड्यावर केला शॅम्पेनचा वर्षांव, भारताचा विजयानंतरच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल 

संघ ठरले आता ठिकाण अन् वेळही निश्चित! वाचा भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---