भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादव हा सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. दोन वर्षांपूर्वी पदार्पण केलेल्या सूर्याने मागील सहा महिन्यांपासून टी20 फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वलस्थान टिकवून ठेवले आहे. त्याच्या या सातत्यापूर्ण खेळामुळे वनडे व आता कसोटी संघातही त्याची निवड झाली. त्यानंतर भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अझरूद्दीन यांनी देखील त्याचे कौतुक केले.
तीन वेळा वनडे विश्वचषकात भारताचे नेतृत्व केलेल्या अझरुद्दीन यांनी नुकतीच एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी सूर्यकुमार यादव याचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले,
“सूर्यकुमार एक अविश्वसनीय फलंदाज आहे. मला वाटते की तो विराट कोहली वर रोहित शर्मा यांच्याप्रमाणे तिन्ही प्रकारच्या क्रिकेटचा उत्कृष्ट फलंदाज बनू शकतो. त्याने आत्तापर्यंत तरी तसा खेळ दाखवलेला आहे.”
सूर्याच्या टी20 प्रदर्शनाचा विचार केला, तर या प्रकारात त्याने आतापर्यंत 45 सामने खेळले आहेत. यापैकी 43 सामन्यांमध्ये त्याने फलंदाजी केली आणि 46.41 च्या सरासरीने 1578 धावा केल्या आहेत. टी20 प्रकारात त्याने तीन शतके आणि 13 अर्धशतके केली आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 180.34 राहिला आहे. टी20 प्रकारात अप्रतिम खेळ दाखवणारा सूर्यकुमार वनडे प्रकारात मात्र अद्याप अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाहीये. त्याने भारतासाठी आतापर्यंत 17 वनडे सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये 16 वेळा त्याला खेळण्याची संधी मिळाली, ज्यामध्ये 29.85 च्या सरासरीने 388 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुढील महिन्यात होत असलेल्या कसोटी मालिकेसाठीच्या पहिल्य दोन सामन्यासाठी त्याची संघात निवड झाली आहे. तो प्रथमच भारताच्या कसोटी संघात दिसेल. सध्या सुरू असलेल्या रणजी ट्रॉफीच्या पहिल्या दोन सामन्यात तो मुंबईसाठी सहभागी झालेला.
(Mohmmmad Azharuddin Said Suryakumar Yadav Is All Format Batter Like Virat And Rohit)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नाद नाद नादच! भारताचा 19 वर्षांखालील महिला विश्वचषकात विश्वविक्रम, वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान
‘रोहितलाही विराटसारखी वागणूक द्या…’, गौतम गंभारची मोठी प्रतिक्रिया