भारतीय क्रिकेटमध्ये एकापेक्षा एक प्रतिभाशाली खेळाडू येता आहेत. त्यामुळे भारतीय संघाने जागतिक क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. मोक्ष मुरगई हा असाच एक युवा प्रतिभाशाली खेळाडू आहे. खूप कमी वयात त्याने खेळाच्या जोरावर आपली ओळख निर्माण केली आहे.
20 वर्षीय मोक्ष मुरगईने वयाच्या सातव्या वर्षी एमएस धोनीपासून प्रेरित होत क्रिकेटमध्ये कारकीर्द घडवण्याचे स्वप्न पाहिले. काही दिवसांपूर्वी दिल्ली विद्यापीठतील विद्यार्थी क्रीडा संघटनेच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती केली आहे. तो आपल्या महाविद्यालयाच्या क्रिकेट संघाचा कर्णधार देखील आहे.
आपल्या नेतृत्वाखाली त्याने संघाला अनेक विजय मिळवून दिले आहेत. 14, 15,16 आणि 19 वर्षाखालील संघात त्याने चांगली कामगिरी केली आहे. मागील क्रिकेट हंगामात त्याने दमदार फलंदाजी करत 1200 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
उजव्या हाताने फलंदाजी करणारा मोक्ष मुरगई 2019-20 मध्ये मेरठच्या एसएच स्पोर्ट्स बरोबर करार केला आहे. यासोबत स्थानिक रेल्वे रणजी आणि 23 वर्षांखालील संघात तो खेळला आहे. लखनऊमध्ये 2019 साली झालेल्या एका स्पर्धेत त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. मोक्ष मुरगईने स्थानिक सामन्यात 250 पेक्षा जास्त बळी, 30 पेक्षा अधिक शतके 50 जास्त अर्धशतके ठोकली आहेत.
मोक्ष मुरगई हा रोज चार ते पाच तास सराव करतो तसेच आपल्या फिटनेसवर देखील भर देतो. त्याला काही दिवसांपूर्वी पाठदुखीने त्रस्त केले आहेत. पण तरीही तो क्रिकेट खेळणे सोडत नाही.